शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात निशिकांत भोसले-पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST

इस्लामपूर : इस्लामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचा वाढदिवस इस्लामपूर विधानसभा मतदार संघात कोविड ...

इस्लामपूर : इस्लामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचा वाढदिवस इस्लामपूर विधानसभा मतदार संघात कोविड योद्ध्यांचा सन्मान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, कोरोना लढाईत बेरोजगारीने त्रस्त असलेल्या घटकांना धान्य व रेशन किट वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कोरोनाचे संकट व पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे बाहेरगावी जावे लागल्याने नगराध्यक्ष पाटील शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हते. मात्र राज्यभरातून अनेकांनी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सकाळी मातोश्री शशीकला भोसले-पाटील, पत्नी सुनीता, कन्या प्रांजली, चिरंजीव प्रत्युष यांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवसेनेचे आमदार राहुल पाटील, भाजपाचे आमदार राहुल आहेर, महाराष्ट्र राज्य आयुर्वेद काॅलेज असोसिएशनचे अध्यक्ष व भाजपाचे ज्येष्ठ नेते डाॅ. बाळासाहेब आहेर, आमदार जयप्रकाश छाजेड, हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी, युवा नेते गौरव नायकवडी, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, भाजपाचे राजेश पांडे, भाजपा वैद्यकीय सेलचे अजित गोपझडे, यशवंत शिक्षण मंडळ कोडोलीचे डाॅ. जयंत पाटील, शिराळ्याचे नगरसेवक केदार नलवडे, शिराळा भाजपा तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, गोकुळ दूधच्या संचालिका अंजलीताई रेडेकर आदींसह मान्यवरांनी दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला.

भाजपाचे श्रीकांत भारती, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक वैभव पवार, पक्षप्रतोद विक्रम पाटील, अमित ओसवाल, चेतन शिंदे, शकील सय्यद, संजय कोरे, विश्वास डांगे, नगरसेविका प्रतिभा शिंदे, मंगल शिंगण, कोमल बनसोडे, अन्नपूर्णा फल्ले यांच्यासह सर्व नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या.