शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
4
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
5
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
6
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
7
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
8
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
9
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
10
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
11
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
12
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
13
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
14
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
15
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
16
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
17
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
18
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
19
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
20
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा

आयुक्तांच्या हाती खोरे,

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

सांगलीत स्वच्छता मोहीम : अधिकारी उतरले रस्त्यावर

सांगली : महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रवींद्र खेबूडकर यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी वाल्मिकी आवास वसाहतीत खेबूडकर यांनी स्वत: खोरे, फावडे हाती घेत गटारीतील कचरा साफ केला. त्यांंच्यासोबतच उपायुक्तांपासून सर्वच खातेप्रमुखांनी डोक्यावर कचऱ्याच्या टोपल्या घेऊन स्वच्छतेला वाहून घेतल्याचे चित्र दिसत होते. आयुक्त खेबूडकर यांनी वाल्मिकी घरकुल वसाहतीत स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी आयुक्त खेबूडकर अधिकाऱ्यांसमवेत स्वत:च स्वच्छतेसाठी वसाहतीत उतरले. सकाळी सात-साडेसात वाजताच स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. या वसाहतीत लोकांनी अक्षरश: हागणदारी केली आहे. दोन इमारतीमध्ये घरातली कचरा टाकला होता. अनेक घरांचे पाईपला गळती होती. यामुळे घरातील सांडपाणी इमारतीवरून ओघळून खाली येत होते. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. आयुक्त खेबूडकर यांनी स्वत:च हातात खोरे घेऊन गटारी मोकळ्या केल्या. सर्व अधिकाऱ्यांनी इमारतीच्या मध्ये टाकलेला कचऱ्याचा ढीग उचलला. टोपलीतून कचरा उचलून अधिकाऱ्यांनी रांग करून गाडीत भरला. दुसऱ्या गटाने औषध फवारणी सुरु केली. पावडर मारण्यात आली. मागच्या बाजूला नाल्याशेजारीच महापालिकेचे शौचालय मोडकळीस आले आहे. त्या ठिकाणी लोक उघड्यावर अधिकाऱ्यांसमोरच शौचास जात होते. खेबूडकर यांनी स्वत: या भागातील कचरा उचलला. सुमारे दोन-अडीच तास श्रमदान केल्यानंतर आयुक्त खेबूडकर यांनी आरोग्य अधिकारी डॉ. आंबोळे यांना स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांच्यासह थांबण्याचे आदेश दिले. उपायुक्त सुनील पवार, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे, नगरसचिव चंद्रकांत आडके, मुख्य लेखापरिक्षक संजय गोसावी, आर. पी. जाधव, नकुल जकाते, सतीश सावंत, परमेश्वर हलकुडे मोहिमेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) लोकप्रतिनिधींची पाठमहापालिका क्षेत्रातील स्वच्छता मोहिमेत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीही सहभागी व्हावे, अशी अपेक्षा होती. पण या मोहिमेकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली. माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर वगळता एकही नगरसेवक वाल्मिकी-आंबेडकर वसाहतीत उपस्थित नव्हता.