शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

...तर आयुक्त, पदाधिकाऱ्यांचे हात-पाय बांधण्यात येतील

By admin | Updated: September 13, 2016 00:51 IST

बच्चू कडू : सांगलीत सुधार समिती कार्यालयाचे उद्घाटन

सांगली : देशातील लोकप्रतिनिधींना राजकीय पक्षाचा झेंडा महत्त्वाचा वाटतो आहे. त्यांना नागरी सुविधांसाठी तडफडणारी जनता दिसत नाही. लोकशाहीला लागलेली ही कीड नाहीशी करण्यासाठी जनतेनेच संघटित झाले पाहिजे, असे मत व्यक्त करीत, राज्यातील महापालिकांनी अपंगांसाठीचा निधी खर्च न केल्यास आयुक्तांसह पदाधिकाऱ्यांचे हात-पाय बांधू, असा इशारा अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी सांगलीत दिला. सांगली जिल्हा सुधार समिती कार्यालयाचे उद्घाटन बच्चू कडू यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. के. डी. शिंदे, समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, मुनीर मुल्ला, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गायकवाड उपस्थित होते .यावेळी आमदार कडू म्हणाले की, मंत्रालयातील अधिकारी मुजोर झाले आहेत. सामान्य नागरिक, शेतकऱ्यांची कामे होत नाहीत. याचे कारण लोकशाहीला कीड लागली आहे. जातीच्या नावावर मते घेऊन राजकारण सुरू आहे. मंत्रालयात अनेक सचिव, मंत्री आहेत. तरीही सामान्य माणसांचे प्रश्न सुटत नाहीत. आम्ही विधानसभेत कायदे करून ते पाळण्याचा प्रयत्न करतो. याउलट अधिकारी कायदेच पाळत नाहीत. सुधार समिती अशा मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम करते आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. अच्छे दिन दिल्लीतून नव्हे, तर गल्ली-गल्लीतून येणार आहेत. यासाठी जनतेनेच संघटित झाले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कार्याध्यक्ष शिंंदे म्हणाले की, भ्रष्ट राजकारण्यांनी सांगलीची वाट लावली. असंख्य महाविद्यालये, रुग्णालये आहेत, पण सुविधांसाठी लढावे लागते. भ्रष्ट नगरसेवकांनी सांगलीची ओळखच पुसली आहे. महापौर हे महासभेत शड्डू ठोकतात. महासभेत मटकेवाले, दारुवाले, अतिक्रमण करणारे लोकप्रतिनिधी असतात. सत्तेतील एक गट विरोधात काम करतो आहे. विरोधक म्हणून या सदस्यांना चाड असेल, तर पदाचे राजीनामे देऊन त्यांनी मैदानात उतरावे. सांगलीकरांना मूर्ख बनविण्याचा उद्योग बंद करावा. मुरुम टाकण्याची स्टंटबाजी बंद करावी, अशी टीकेची झोड त्यांनी उठविली. (प्रतिनिधी)हे कसले ब्रॅन्डिंग ?जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगली ब्रँडिंगचा बोलबाला सुरू केला आहे. पण हे कसले ब्रॅँडिंग? जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळाने त्रस्त आहेत. सांगली शहरात रस्त्यांच्या खड्ड्यांनी कंबरडे मोडले आहे. व्यापार, उद्योग संपला आहे. पुढील दोन वर्षात या अधिकाऱ्यांना कारभार सुधारण्यासाठी सुधार समिती भाग पाडेल. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी महापालिकेचा बिग बाजार केला, तर काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी अक्षरश: आठवडा बाजार केला. जयंतरावांनी सांगलीकरांना मोनोरेल नावाची कॅडबरी दाखवली, तर शुध्द पाण्याचे चॉकलेट दाखवले, अशा शब्दात अ‍ॅड. अमित शिंंदे यांनी जयंत पाटील व सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली.