शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामेरीतील अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: January 21, 2015 23:54 IST

दहा अतिक्रमणे काढली : ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनेक वर्षांच्या लढ्यास यश

कामेरी : कामेरी ग्रामपंचायत व महसूल विभागाच्यावतीने गट नं. ३७७९/अ व सिटी सर्व्हे नं. ३0 मधील कामेरी—शिवपुरी रोडलगतची अतिक्रमणे काढण्यास आज (बुधवारी) सुरुवात करण्यात आली. कामेरी—शिवपुरी रस्त्यालगतची राष्ट्रीय महामार्ग ते शिवपुरी रस्त्यावरील गोंधळी बोरपर्यंतची १0 अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली.गेल्या अनेक वर्षांपासून ३७७९/अ सर्व्हे नं.मधील अतिक्रमणे काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून ग्रामसभेत होत होती. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडून चालढकल केली जात होती. आज अखेर ग्रामपंचायतीने या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. यामध्ये रमेश थोरात, आनंदा मदने, योगेश मदने, आकाराम पाटील, लालासाहेब मोहिते, हरीभाऊ संकपाळ, महादेव संकपाळ, जमुनाबाई गायकवाड, शंकर भांबुरे यांची जनावरांचे गोठे, शेड, पिठाची गिरणी अशी अतिक्रमणे काढण्यात आली.या अतिक्रमण मोहिमेत मंडल अधिकारी जे. एम. गात—पाटील, तलाठी एस. के. हुलके, ग्रामसेवक बादशहा नदाफ, सरपंच अशोक कुंभार, उपसरपंच अनिल पाटील, मानसिंग पाटील, पोपट पाटील, रणजित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अतिक्रमण काढण्यासाठी तीन जेसीबी, दोन ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.सर्वांना नोटिसा बजावून अतिक्रमणे काढण्याची यापूर्वीही विनंती केली होती. याला प्रतिसाद न मिळाल्यामुळेच आम्ही कारवाई सुरु केली आहे. स्वत:हून अतिक्रमणे काढून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन बादशहा नदाफ यांनी केले आहे. (वार्ताहर)सर्व १२० अतिक्रमणे काढणार : नदाफनिश्चित केलेली सर्व १२0 अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. तोपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. यामध्ये कोणताही पक्षपात अथवा कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने घेण्यात येणार आहे, असे मत ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ यांनी व्यक्त केले.ग्रामस्थांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे. याला किती ग्रामस्थ सहकार्य करणार, याकडे लक्ष लागून आहे.या अतिक्रमण मोहिमेत मंडल अधिकारी जे. एम. गात—पाटील, तलाठी एस. के. हुलके, ग्रामसेवक बादशहा नदाफ, सरपंच अशोक कुंभार, उपसरपंच अनिल पाटील, मानसिंग पाटील, पोपट पाटील, रणजित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.