शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये पावणेदोन लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST

फोटो ओळ : कुपवाडमध्ये पोलिसांनी सुगंधी तंबाखू आणि गुटख्याच्या साठ्यावर कारवाई केली. लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : मिरज औद्योगिक ...

फोटो ओळ : कुपवाडमध्ये पोलिसांनी सुगंधी तंबाखू आणि गुटख्याच्या साठ्यावर कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीलगतची गुलमोहर काॅलनी, दुर्गानगर येथून कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी एक लाख ८४ हजार ८० रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिसांनी गुटखा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव पांडुरंग देविदास सावंत (वय २८, रा.दुर्गानगर, कुपवाड) असे आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेेेेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना मिरज एमआयडीसीजवळ एक तरुण सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बुधवारी रात्री साहाय्यक निरीक्षक उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल, साहाय्यक पोलीस फौजदार युवराज पाटील, शिवानंद गव्हाणे, सतीश माने, इंद्रजित चेळकर, विजय घस्ते यांनी दुर्गानगर येथे सापळा रचला.

यावेळी दुर्गानगरजवळ एक तरुण प्लास्टिकच्या पिशव्यांतून काहीतरी घेऊन जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यावेळी पोलिसांनी विचारणा केल्यावर संशयित पांडुरंग सावंत मुद्देमाल रस्त्यावर टाकून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याला कुपवाड पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करण्यासाठी असल्याची कबुली दिली. कुपवाड पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे.