शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली रोझ सोसायटीतर्फे जानेवारीत गुलाबपुष्प प्रदर्शन

By admin | Updated: December 8, 2015 00:44 IST

विविध कार्यक्रम : अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा

सांगली : दि सांगली रोझ सोसायटी सांगली आणि मराठा समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० जानेवारी रोजी हिवाळी गुलाबपुष्प प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रोझ सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब चितळे व सरचिटणीस प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, डॉ. प्रकाश पुरोहित यांनी स्थापन केलेल्या दि रोझ सोसायटीच्यावतीने गेली ३७ वर्षे हे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली जाते. पण सांगली जिल्ह्यात असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता, गेली दोन वर्षे गुलाबपुप्प प्रदर्शन न भरविण्याचा निर्णय सोसायटीच्यावतीने घेण्यात आला होता. यंदा ९ व १० जानेवारी दरम्यान सांगलीत मराठा समाज संस्थेच्या सभागृहात हे हिवाळी गुलाब पुप्प प्रदर्शन भरविण्यात येत आहे. प्रदर्शनात व पहिल्या चारही विभागात कोणाही व्यक्तीला भाग घेता येईल. महाराष्ट्रात मतिमंद व मूकबधीर मुला-मुलींसाठी स्वतंत्र विभाग असून, या मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांच्यासाठी ही स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात येते व त्यांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध फुलझाडे हॅन्डीक्राफ्ट व टेराकोटा आदी वस्तू व बागकाम साहित्याचे स्टॉल्स उभे केले जाणार आहेत.सोसायटीचे ट्रस्ट अध्यक्ष प्राचार्य पी. वाय. मद्वाण्णा, खजिनदार अतुल दप्तरदार, महिला विभागप्रमुख भारती चोपडे, श्रेया भोसले, डॉ. सपना भाटे, नेहा कुलकर्णी, नंदा झाडबुके, शैला देशमाने, डॉ. विवेक शिराळकर, पापा पाटील, गजानन पटवर्धन आदी संयोजन करीत आहेत. (प्रतिनिधी)डेकोरेशनसाठी बक्षिसेपुष्परचना स्पर्धेत ‘किंग आॅफ दि शो’, क्विन आॅफ दि शो’, ‘प्रिन्स आॅफ दि शो’, ‘प्रिन्सेस आॅफ दि शो’ आणि जनरल तसेच चॅम्पियनशिप, फ्लोरिस्ट डेकोरेशनसाठी ट्रॉफी व इतर विविध ट्रॉफीज, प्रमाणपत्रे अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत कोणालाही भाग घेता येणार आहे