शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन, निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनांच्या पुढाकाराने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी संघटनांच्या पुढाकाराने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून वाॅकला सुरुवात झाली. ‘फुले-शाहू-आंबेडकर.. आम्ही सारे दाभोलकर’ ‘विवेकाचा आवाज बुलंद करू’, ‘लढेंगे जितेंगे’ अशा घोषणा देत फेरी निघाली. महात्मा गांधी पुतळ्याजवळ समारोप झाला.

माजी आमदार प्रा. शरद पाटील म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. दाभोलकरांनी आयुष्यभर विवेकी विचारांचा प्रचार केला, शांततेच्या अहिंसक मार्गाने लढे दिले. अशा माणसाचा भरदिवसा खून होतो आणि खूनी, सूत्रधार अद्याप सापडत नाहीत याचा आम्ही निषेध करतो.

ॲड. के. डी. शिंदे म्हणाले, देवाधर्माच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीविरुद्ध दाभोलकरांनी काम केले. त्यांच्या पश्चात विवेकवादी चळवळ वाढविणे हीच खरी आदरांजली ठरेल.

अंनिसचे संजय बनसोडे म्हणाले, राजकीय शक्तीच्या अभावामुळे दाभोलकरांचे खुनी पकडले जात नाहीत. त्यांचा विचार अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी विकास मगदूम, जनार्दन गोंधळी, चंद्रकांत शिंदे, डॉ. प्रदीप पाटील, शंकर शेलार, डॉ. संजय निटवे, ॲड. भारत शिंदे, उज्ज्वला परांजपे, डॉ. संजय पाटील, योगेश कुदळे आदी उपस्थित होते. पद्मजा मगदूम, शुभांगी चव्हाण, जितेंद्र भिलवडीकर, मुनीर मुल्ला, चंद्रकांत वंजाळे, प्रा. बी. आर. जाधव आदींनी संयोजन केले.