शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचे घोटाळे ‘पीआरसी’च्या दरबारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 01:02 IST

अहवालच गायब : पाठीराख्यांचीही होणार गोची

सांगली : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचे दहा ते पंधरा वर्षात लेखापरीक्षणच झाले नसून, काही ठिकाणी ग्रामसेवकांनी दफ्तरच गायब केले आहे. यामुळे घोटाळ्यांचा पुढे तपास होत नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याची सर्व माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने पंचायत राज समितीकडे (पीआरसी) दिली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीआरसी समिती येणार असल्यामुळे ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण केल्यानंतर चारशे ग्रामपंचायतींमध्ये तीन कोटींचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा अपहार १९८९ ते २००१ या काळातील असून, पंचवीस वर्षांत दोषी ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर जुजबी कारवाई झाली आहे. याशिवाय, चाळीस ग्रामपंचायतींमध्ये ४० लाख १४ हजार ९४२ रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता़ यापैकी माळवाडी (ता़ पलूस), आटपाडी तालुक्यातील उंबरगाव, विठलापूर, शिराळा तालुक्यातील मणदूर, कडेगाव तालुक्यातील तडसर, कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, चोरोची आणि वाळवा तालुक्यातील वाळवा आदी ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांनी १२ लाख ४३ हजार ५७२ रुपये जिल्हा परिषदेकडे भरले आहेत़ उर्वरित १७ ग्रामपंचायतींमधील आजी-माजी सरपंच आणि ग्रामसेवकांनी घोटाळ्यातील २७ लाख ७१ हजार ३७० रुपये जिल्हा परिषदेकडे भरलेले नाहीत़ पलूस, मिरज, जत तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये लेखापरीक्षणासाठी दफ्तरच उपलब्ध नसल्याचा प्रकारही चौकशीत पुढे आला आहे. येथील घोटाळ्याचे आकडे कोटीपर्यंत असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत आहे. ग्रामपंचायतीमधील या घोटाळ्याची पुराव्यांसह एका सामाजिक कार्यकर्त्याने पंचायत राज समितीकडे तक्रार केली आहे. समितीनेही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून, जुलैमध्ये ही समिती जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. यावेळी घोटाळ्यातील संबंधित ग्रामपंचायतींची ते पाहणी करणार असल्याचे समजते. पाणी योजना, रोजगार हमीची कामे, वित्त आयोग आदींचा निधीही थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. यामुळे या निधीतून काही ग्रामपंचायतींमध्ये चांगली विकास कामे झाली आहेत. पण, काही गावात वर्षानुवर्षे त्याच त्या गटाची सत्ता आहे. त्यांच्याकडून कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे. लोकप्रतिनिधींनी ग्रामसेवकांना हाताशी धरूनच घोटाळा केला आहे. काही गावात तर लोकप्रतिनिधींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आठवडा बाजारातील कर, घरपट्टी, पाणीपट्टीच्या पैशावर ग्रामसेवकांनी डल्ला मारल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)