शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘कडेगाव’मधील दहा गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस

By admin | Updated: January 21, 2015 23:51 IST

आरक्षण जाहीर : पतंगराव कदम-पृथ्वीराज देशमुख गट आमनेसामने

कडेगाव : तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणुका होणार असून, त्यादृष्टीने आरक्षणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुका यावेळी काँग्रेस विरुध्द भाजप अशा रंगणार असून, यामध्ये कडेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.सांगली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जुलै, डिसेंबरअखेर संपणार आहे, अशा ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, कडेगाव, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतीज या १0 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुक्याचे ठिकाण असलेल्या कडेगाव ग्रामपंचायतीचा समावेश असून, कडेगावला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आल्याने येथील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या कडेगाव तालुक्यावर काँग्रेसचे वर्चस्व आहे, तर कडेगाव ग्रामपंचायतीवर १७ पैकी १३ सदस्य सध्या काँग्रेसचे आहेत. त्यामुळे कडेगाववर सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. तशा प्रकारच्या हालचाली सध्या सुरु आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यामुळे पुन्हा एकदा कडेगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापणार आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम यांच्याविरोधात तुल्यबळ लढत दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे कडेगावची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरणार आहे. यापूर्वी सतत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र येऊन सत्तेत भागीदारी मिळवत असत. यावेळी असे काही घडणार नाही. राष्ट्रवादीला या निवडणुकीत फारसे काही हाती लागणार नाही, कारण राष्ट्रवादीकडे तुल्यबळ असा नेता नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीनिमित्त माजी आमदार देशमुख व पतंगराव कदम गट आमने-सामने उभे राहणार आहेत. साहजिकच ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरणार आहे.त्यासाठी सध्या दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. शाळगाव परिसरातील ढाणेवाडी, कान्हरवाडी, येतगाव, कोतीजच्या निवडणुका विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण शाळगावच्या नुकत्याच झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. सोनहिरा खोऱ्यात रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, येथे भाजपचा कस लागणार आहे. (वार्ताहर)कडेगावसाठी जोरदार लढतरामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, कडेगाव, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतीज या १0 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कडेगावला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात आल्याने येथील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असली तरी, भाजपही वर्चस्वासाठी जोरदार प्रयत्न करेल.