सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये पी. एन. काळे, अध्यक्ष जे. के. महाडिक, डी. जी. मुलाणी, एस. एच. सूर्यवंशी, विजय तोडकर, प्रशांत कोळी आदींनी भाग घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे गुरुवारी निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी देशव्यारी राष्ट्रीय विरोधी दिन पाळला.
विजयनगरमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय भवनसमोर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. संघटनेतर्फे पी. एन. काळे, अध्यक्ष जे. के. महाडिक, डी. जी. मुलाणी, एस. एच. सूर्यवंशी, विजय तोडकर, प्रशांत कोळी, बी. डी. शिंदे, दत्ता ढमाले आदींनी नेतृत्व केले. कंत्राटीकरण व खासगीकरण रद्द करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे भरावीत, कोरोनाने मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत घ्यावे, केंद्राने जीएसटीचा राज्याचा वाटा त्वरित वळता करावा, कर्मचारीभिमुख दृष्टिकोन ठेवावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.