ओळी :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे जयश्री पाटील यांच्या विजय बंगल्यावर स्वागत करण्यात आले. यावेळी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, सिकंदर जमादार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी रविवारी जयश्री मदन पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, मदनभाऊ युवा मंचाचे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे जयश्री पाटील यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, सिकंदर जमादार, विठ्ठल पाटील उपस्थित होते. पटोले यांनी मदनभाऊ युवा मंचाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंचच्या वतीने गौण खनिज वाहतूक कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उदय पाटील, अविनाश जाधव, महेश कर्णे, शेखर पाटील, मयूर बांगर, प्रवीण निकम, जयराज बर्गे, अमोल झांबरे, अमित लाळगे, ॲड. भाऊसाहेब पवार, रत्नाकर नांगरे, रामचंद्र कुट्टे, नितीन भगत, राहुल मोरे, अवधूत गवळी, शरद गाडे, सुरज मुल्ला, सुजित लकडे, तोफिक कोतवाल उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आमदार नानासाहेब पटोले यांनी आज जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मा. मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने प्रदेशाध्यक्षांना गौण खनिज वाहतूक कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उदय पाटील, अविनाश जाधव, महेश कर्णे, शेखर पाटील, मयूर बांगर, प्रवीण निकम, जयराज बर्गे, अमोल झांबरे, अमित लाळगे, ॲड. भाऊसाहेब पवार, रत्नाकर नांगरे, रामचंद्र कुट्टे, नितीन भगत, राहुल मोरे, अवधूत गवळी, शरद गाडे, सुरज मुल्ला, सुजित लकडे, तोफिक कोतवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.