शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोला यंदा सोन्याचा भाव

By admin | Updated: June 16, 2016 01:08 IST

किलोला शंभर रुपये : ‘लाल चिखल’ नव्हे, ‘लाल सोने’!

सांगली : तीव्र पाणीटंचाई व बेभरवशाच्या बाजारपेठेमुळे शेतकरी घायकुतीला आला असतानाच, दरवर्षी मातीमोल दराने विकण्याची वेळ येणाऱ्या टोमॅटोला यंदा मात्र सोन्याचा भाव आला आहे. उत्पादनात झालेली घट व मागणी वाढल्याने सध्या शहरातील बाजारात टोमॅटोला किलोला ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अजून महिनाभर असाच चढा दर कायम राहील, असा विश्वास मिरज पूर्व भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात आघाडी घेत असलेल्या मिरज पूर्व भागात यंदा ‘लॉटरी’ म्हणून घेतलेले टोमॅटोचे पीक चांगलेच साधले आहे. चाबुकस्वारवाडी, सलगरे, बेळंकी, लिंगनूर, खटाव आदी गावांमध्ये भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र असून बहुतांश शेतकरी बाजाराच्या मागणीनुसार भाजीपाला उत्पादन घेतात. सध्या या भागात मिरज, सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, कऱ्हाड, पनवेलसह इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा टोमॅटो खरेदीसाठी राबता आहे. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक धोकादायक पीक म्हणून टोमॅटो ओळखला जातो. दर मिळाला तर ठिक, नाही तर तो फेकून देण्याची वेळ येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत. मात्र, पूर्व भागातील खटाव, लिंगनूर भागात यंदा टोमॅटोचे घेण्यात आलेले उत्पादन फलदायी ठरले आहे. टोमॅटोचे पीकही नाजूक असल्याने थोड्याशा वाऱ्यामुळे प्लॉट जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)टोमॅटोला यंदा सोन्याचा भावकिलोला शंभर रुपये : ‘लाल चिखल’ नव्हे, ‘लाल सोने’!सांगली : तीव्र पाणीटंचाई व बेभरवशाच्या बाजारपेठेमुळे शेतकरी घायकुतीला आला असतानाच, दरवर्षी मातीमोल दराने विकण्याची वेळ येणाऱ्या टोमॅटोला यंदा मात्र सोन्याचा भाव आला आहे. उत्पादनात झालेली घट व मागणी वाढल्याने सध्या शहरातील बाजारात टोमॅटोला किलोला ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अजून महिनाभर असाच चढा दर कायम राहील, असा विश्वास मिरज पूर्व भागातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनात आघाडी घेत असलेल्या मिरज पूर्व भागात यंदा ‘लॉटरी’ म्हणून घेतलेले टोमॅटोचे पीक चांगलेच साधले आहे. चाबुकस्वारवाडी, सलगरे, बेळंकी, लिंगनूर, खटाव आदी गावांमध्ये भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र असून बहुतांश शेतकरी बाजाराच्या मागणीनुसार भाजीपाला उत्पादन घेतात. सध्या या भागात मिरज, सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, कऱ्हाड, पनवेलसह इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा टोमॅटो खरेदीसाठी राबता आहे. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक धोकादायक पीक म्हणून टोमॅटो ओळखला जातो. दर मिळाला तर ठिक, नाही तर तो फेकून देण्याची वेळ येत असल्याने बहुतांश शेतकरी या पिकाकडे वळत नाहीत. मात्र, पूर्व भागातील खटाव, लिंगनूर भागात यंदा टोमॅटोचे घेण्यात आलेले उत्पादन फलदायी ठरले आहे. टोमॅटोचे पीकही नाजूक असल्याने थोड्याशा वाऱ्यामुळे प्लॉट जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांत खुशी, ग्राहकांत गमरोजच्या आहारात टोमॅटोला महत्त्व असल्याने ग्राहकांकडून नेहमीच खरेदीला प्राधान्य असते. मात्र, यंदा दर ऐंशी ते शंभरावर जाऊन पोहोचल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. याउलट शेतकऱ्यांनी यंदा चांगला दर मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.अडचणींवर मात करून थोडे धाडसानेच यंदा टोमॅटोचे उत्पादन घेतले असून चांगला दर मिळत असल्याने समाधानी आहे. सध्या दिवसआड तोड घेत असून मुंबई बाजारपेठेत माल पाठविला जात आहे. सध्या ६५ ते ७२ रुपयांपर्यंत दर मिळाला असला तरी, अजून दर मिळण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत टोमॅटोची आवक कमी असल्याने अजून जादा दर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. - सुखदेव कोरे, टोमॅटो उत्पादक, बिब्बी मळा, बेळंकी (ता. मिरज).