शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना पाच वर्षांची मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:20 IST

पंचायत समितीची सभा व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या ...

पंचायत समितीची सभा व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत पार पडली.

सभेच्या सुरुवातीस महापालिकेने जनावरांचा कत्तलखाना कायमचा बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यास आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी बाकी असताना काकासाहेब धामणे यांनी पदाधिकाऱ्यांना पाच वर्षांचा वाढीव कालावधी द्यावा, असा मुद्दा उपस्थित केला.

ते म्हणाले, ३६ वर्षांपूर्वी आपत्कालीन परिस्थितीमुळे तत्कालीन राज्य शासनाने निवडणुका टाळून १९८५ मधील पदाधिकाऱ्यांना १९९५ पर्यंत मुदतवाढ दिली होती.

सदस्यांनी ही मागणी उचलून धरल्याने सभापती खवाटे, उपसभापती आमटवणे यांनी तसा ठराव घेण्याची सूचना केली. तसा ठराव शासनाकडे पाठविण्यात येईल, असे गटविकास अधिकारी सरगर यांनी सांगितले.

अशोक मोहिते, किरण बंडगर, कृष्णदेव कांबळे, छाया हत्तेकर यांनी समस्या मांडल्या. तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय सावंत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा मांडला.

चौकट

पोलिसांचा त्रास थांबवा!

दूध व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत समावेश असतानाही रात्री नऊपर्यंत वेळेचे पालन करीत ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या व्यावसायिकांना दमदाटी करत पोलीस आर्थिक लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा उपसभापती अनिल आमटवणे, मोहिते, धामणे यांनी दिला. जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तशी तक्रार देण्याचाही सभेत निर्णय घेतला.

चौकट

मुदतवाढीसाठी मंत्र्यांना भेटणार

आपत्कालीन परिस्थितीमूळे गेल्या अडीच वर्षात कामकाज करता आले नाही. कोरोनाचाही प्रभाव कमी झालेला नाही. संकटकाळात निवडणुका घेणे परवडणारे नसल्याने पदाधिकाऱ्यांना मुदतवाढीसाठी पालकमंत्र्यांना भेटण्याचा व मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला.