शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

नकुशा झाल्या हव्याहव्याशा, दत्तकसाठी मुलींनाही पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST

सांगली : कोरोना काळात थांबलेली दत्तक प्रक्रिया आता पुन्हा सुरु झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमध्ये प्रवासावर निर्बंध असल्याने ही ...

सांगली : कोरोना काळात थांबलेली दत्तक प्रक्रिया आता पुन्हा सुरु झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमध्ये प्रवासावर निर्बंध असल्याने ही प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता.

अनाथ मुले आणि अपत्यासाठी इच्छुक पालक यांच्यातील दुवा म्हणून कारा ही सरकारी संस्था काम करते. मुले दत्तक घेण्याचे प्रमाण वाढल्याने तसेच अनाथ मुलांची संख्या कमी झाल्याने प्रतीक्षा यादी दोन ते अडीच वर्षांवर गेली आहे. दाम्पत्याच्या वयाची बेरीज शंभरपर्यंत असल्यास दोन वर्षांपर्यंतचे बाळ दत्तक मिळते, बेरीज त्याहून अधिक असेल तर जास्त वयाचे बालक दिले जाते. मिरजेतून गतवर्षी बारा व तेरा वर्षांची बहीण-भावंडे दत्तक घेण्यात आली, ती नव्या कुटुंबात आता चांगलीच रुळली आहेत. देशव्यापी यादीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून दाम्पत्ये दत्तकसाठी येत आहेत.

चौकट

आम्हाला हवी ‘नकोशी’

मुलीला नाकारण्याचे दिवस संपल्याचे सुचिन्ह समाजात दिसू लागले आहे. अनाथाश्रमांमध्ये मुलांसोबतच मुलींनाही दत्तक घेण्याकडे पालकांचा कल आहे. दत्तकसाठी प्राधान्यक्रम देताना मुलींचीही पसंती नोंदवली जात आहे. यापूर्वी अनाथाश्रमांनाच मुली लग्नापर्यंत सांभाळाव्या लागायच्या, आता मात्र अनेक चुणचुणीत मुली दत्तक पालकांच्या घरांना घरपण देताना दिसू लागल्या आहेत. विनाअपत्य दाम्पत्यांना पालकांचे सौभाग्य मिळवून देत आहेत.

चौकट

दोन-अडीच वर्षे थांबण्याची तयारी हवी

दत्तकासाठीचा प्रतीक्षा काळ दोन ते अडीच वर्षांवर गेला आहे. ‘कारा’च्या संकेतस्थळावर देशभरातून नोंदणी होते. दत्तक घेण्यासाठी कारा (सेन्ट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी) संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते, त्यानंतर प्रत्यक्ष बाळ मिळेपर्यंत दोन ते अडीच वर्षे लागतात, असा अनुभव आहे. त्यामुळे दत्तक घेणाऱ्यांची प्रतीक्षा यादी खूपच लांबत आहे. पालकांच्या संख्येच्या तुलनेत बाळांची संख्या कमी असल्याचाही हा परिणाम आहे. तमिळनाडू, दिल्ली, कोलकत्ता आदी शहरांतूनही दत्तकासाठी दाम्पत्ये सांगली, कोल्हापूरला येत आहेत.

पाॅईंटर्स

२०१६ - ७, २०१७ - ८, २०१८ - ९, २०१९ - ७, २०२० - ४

सर्वाधिक बालके २०१८मध्ये दत्तक - ११

कोट

दत्तकची प्रक्रिया कारा संस्थेमार्फत राबविली जाते. ‘कारा’मुळे दत्तक प्रक्रिया अत्यंत पारदर्शी झाली आहे. मुलांसोबतच मुलीही दत्तक घेतल्या जात आहेत. हा बदल चांगल्या समाजाचे निदर्शक म्हणावा लागेल.

- धनश्री दाभाडे, व्यवस्थापक, पाठक अनाथाश्रम, मिरज.