शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कसबे डिग्रज सोसायटीत सत्तेला मिळाली कलाटणी

By admin | Updated: December 1, 2015 00:11 IST

‘जयंत’ पॅनेलची बाजी : ‘ग्रामविकास’च्या सातजणांचे राजीनामे

कसबे डिग्रज : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबे डिग्रज (ता. मिरज) विकास सोसायटीच्या निवडणुकीनंतर झालेल्या पदाधिकारी निवडीत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. निवडणुकीत ग्रामविकास आघाडीला १३ पैकी ७ जागा आणि जयंत पॅनेलला ६ जागा मिळाल्या होत्या. पण अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत जयंत पॅनेलच्या उमेदवारांना सात मते मिळाली. त्यामुळे सत्ता जयंत पॅनेलकडे गेली, पण हा धक्का सहन न झालेल्या ‘ग्रामविकास’च्या नेत्यांनी सर्वांना राजीनामे देण्यास सांगितले. त्यामुळे सातजणांनी सहकार उपनिबंधकांकडे राजीनामे दिले. त्यामुळे झालेली नूतन निवड किती काळ टिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कसबे डिग्रज सोसायटी जिंकण्यासाठी थेट आ. जयंत पाटील यांनी लक्ष घालत राष्ट्रवादीतील गटबाजी मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते, पण यश आले नाही. कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आनंदराव नलवडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे देशमुख, लोंढे, सायमोते, चव्हाण हे गट जयंत विकास आघाडीच्या नावासह आ. पाटील यांचे नेतृत्व मानत एकत्र आले, तर कॉँग्रेसचे माजी जि. प. सदस्य श्रीपाल चौगुले आणि माजी पं. स. सदस्य राष्ट्रवादीचे अजयसिंह चव्हाण ग्रामविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले. या चुरशीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलला १३ पैकी ७ जागा मिळाल्या, तर जयंत आघाडीला ६ जागा मिळाल्या. नुकतीच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. त्यामध्ये ग्रामविकासकडून सर्वाधिक मतांनी विजयी झालेले रमेश काशीद आणि विपूल चौगुले उमेदवार होते, तर जयंत पॅनेलकडून आप्पासाहेब मासुले आणि वंदना रेगे उभे होते. गुप्त मतदान पद्धतीने मतदान झाले आणि नाट्यमय घटना घडल्या. अध्यक्षपदासाठी मासुले आणि उपाध्यक्षपदासाठी रेगे यांनी सात मते मिळवून बाजी मारली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. ए. माळी यांनी काम पाहिले. ‘ग्रामविकास’चा पराभव झाला. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मात्र नेत्यांच्या आदेशानुसार ‘ग्रामविकास’च्या सातही संचालकांनी सहकार उपनिबंधकांकडे राजीनामे दिले.इकडे जयंत पॅनेलने जल्लोष करत राजारामबापू साखर कारखान्यावरील राजारामबापू पुतळ्यास अभिवादन केले. आ. जयंत पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांसह नेत्यांचा सत्कार केला.राजीनामे मंजूर झाल्यानंतर सोसायटीचे संचालक मंडळ अल्पमतात येऊन प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याचे संकेत दिसत आहेत. याबाबत उपनिबंधकांकडून पुढील आठवड्यात पाच तारखेला संचालक मंडळाची बैठक होणार आहे. जर राजीनामे मंजूर झाले तर, संचालक मंडळाचे नूतन पदाधिकाऱ्यांचे अधिकार काय राहणार, प्रशासक नेमले तर काय होणार, प्रशासक मंडळ कोणाचे, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (वार्ताहर)राजकीय संघर्ष : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्षग्रामविकासच्या सातहीजणांनी राजीनामे दिल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार रमेश काशीद व विपुल चौगुले यांची माहिती.जयंत पॅनेलच्या सहाजणांचे संचालक मंडळ टिकणार का, याबद्दल प्रश्नचिन्ह.आनंदराव नलवडे यांचे नेतृत्व मानत राष्ट्रवादीच्या चार-पाच गटांनी पदाधिकारी निवडणूक जिंकली. त्यामुळे आनंदराव नलवडे ठरले किंगमेकर.ग्रामविकासने निवडणुकीत बहुमत मिळवूनही सत्ता गमावली. समर्थक कार्यकर्ते नाराज.प्रशासक मंडळ आले तर नूतन संचालक, पदाधिकारी निवडी टिकणार का, याची चर्चा.