शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

घाटमाथ्यावरील लेकींनी रोवला यशाचा झेंडा

By admin | Updated: May 25, 2016 23:34 IST

जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील कवठेमहांकाळ तालुक्यात तर दुष्काळाने गंभीर रूप धारण केले आहे.

सांगली : कवठेमहांकाळच्या उत्तरेला दिसणाऱ्या डोंगरांच्या भल्यामोठ्या रांगा आणि भीषण दुष्काळाचा सामना करत असताना, शिक्षणाचे स्वप्न विरून जाण्याच्या परिस्थितीवर मात करत तिसंगीच्या आरती आनंदराव भोसले व कुंडलापूरच्या अस्मिता अनिल देशमुख या विद्यार्थिनींनी बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे ८१ टक्के व ८० टक्के गुण मिळवत आदर्श निर्माण केला आहे. आरतीने अकौंटस्मध्ये ९४ गुण मिळवले आहेत, तर अस्मिताने अर्थशास्त्रासारख्या अवघड विषयात ८८ गुण मिळवले आहेत. आता यापुढे हार न मानता सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी प्रशासन सेवेत जाण्याचा आत्मविश्वास अस्मिताने व्यक्त केला, तर बॅँकिंग क्षेत्रात करिअर करणार असल्याचे आरतीने सांगितले. जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील कवठेमहांकाळ तालुक्यात तर दुष्काळाने गंभीर रूप धारण केले आहे. या परिस्थितीमुळे आपल्या पाल्याला शाळेस पाठविण्यासही पालक धजावत नसताना, पालकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत या दोघींनी बारावीत यश मिळविले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, कुंडलापूर ही गावे नेहमीच दुष्काळाशी सामना करतात. मात्र, याचा बाऊ न करता, या गावांतील दोघींनी एकत्रच कवठेमहांकाळ येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयातून बारावी पूर्ण केली. यात पूर्णत: पावसाच्या भरवशावरच शेती असलेल्या शेतकरी कुटुंबातील अस्मिताने मिळविलेले गुण शहरातील पालकांना किंवा अभ्यासकांना थोडेफार कमी वाटत असले तरी, कुंडलापूर ते कवठेमहांकाळ असा दैनंदिन प्रवास करीत आणि घरी गेल्यानंतर पालकांना मदत करीतच तिने बारावी पूर्ण केली आहे. कुंडलापूर येथे केवळ सातवीपर्यंतचीच शाळा उपलब्ध असल्याने तिने आठवी ते दहावीचे शिक्षणही शेजारच्या तिसंगी येथे पूर्ण केले. आरतीची बारावीही याच परिस्थितीत पूर्ण झाली आहे. कुटुंबाच्या पाठबळावर बारावी पूर्ण करीत असतानाच शेतकरी कुटुंबातील या सावित्रीच्या लेकींनी क्षमता तर सिध्द केलीच, शिवाय केवळ परिस्थितीचा बाऊ करीत ध्येय अर्धवट सोडणाऱ्यांसमोर आदर्शही निर्माण केला आहे. या दोघींना वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक यांची साथ लाभली. (प्रतिनिधी)अस्मिताला व्हायचंय अधिकारीअस्मिताला भविष्यात सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल, असे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठीच तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचा मनोदय बोलताना व्यक्त केला. प्रशासनात जाऊन गरजूंची अडचण दूर करण्याचे ध्येय असल्याचेही तिने यावेळी सांगितले. $$्निरात्र महाविद्यालयाचे यशसांगलीच्या एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यंदाच्या बारावी परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. कला शाखेचा निकाल ७५.८६ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ७१.७९ टक्के लागला आहे. या कॉलेजच्या अपर्णा जाधवने कला शाखेत ७५.५३ टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीतही चांगले यश मिळवले आहे.