शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुनवतच्या युवकांकडून परदेशात जहाजावर गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST

सहदेव खोत लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : व्यापारी जहाजांवर (मर्चंट नेव्ही) काम करणाऱ्या पुनवत येथील युवकांनी परदेशात जहाजावर पर्यावरणपूरक ...

सहदेव खोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुनवत : व्यापारी जहाजांवर (मर्चंट नेव्ही) काम करणाऱ्या पुनवत येथील युवकांनी परदेशात जहाजावर पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करून सांस्कृतिक परंपरेचे जतन केले आहे. या उत्सवात परदेशी नागरिकही सहभागी झाल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे.

पुनवत (ता. शिराळा) येथील अनेक युवक मर्चंट नेव्हीमध्ये काम करतात. नोकरीनिमित्त सातत्याने परदेश दौऱ्यावर असतात. सध्या गावातील विजय वरेकर, जितेंद्र जाधव, प्रवीण पाटील, सुनील कदम, रमेश जाधव, शिवाजी उपलाने, विजय पाटील, रविकिरण खोत, तानाजी यादव आदी युवक जहाजावर काम करत आहेत. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने प्रवीण पाटील, विजय वरेकर, रमेश जाधव यांनी चीनजवळ पिवळ्या समुद्रात असलेल्या जहाजावर, तर जितेंद्र जाधव यांनी सिंगापूरमधून मूर्ती मागवून सहकाऱ्यांच्या मदतीने चीनमधील दोंगजियाकाऊ येथे जहाजावर गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. दोन्ही ठिकाणी मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती बसविल्या आहेत. अन्य ठिकाणीही हे मराठमोळे युवक गणेशोत्सव साजरा करत आहेत. या उत्सवात भारताबरोबरच श्रीलंका, बांगलादेश, इथिओपिया आदी देशांतील त्यांचे सहकारी सहभागी झाले आहेत.

पारंपरिक आरती, भजन, महाप्रसाद असे कार्यक्रम होत आहेत. गणेशविसर्जनाच्या दिवशी या मूर्तींची जहाजावर मिरवणूक काढून विधिपूर्वक समुद्राच्या पाण्यात विसर्जित करणार असल्याचे या युवकांनी सांगितले.

चौकट

सांस्कृतिक परंपरेचे जतन

परदेशात जहाजावर मराठमोळा उत्सव साजरा करून सांस्कृतिक परंपरेचे जतन या युवकांकडून होत आहे. गतवर्षी पुनवतच्या आनंदा आंबरे यांनी टांझानिया देशात हा उत्सव साजरा केला होता.