शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या पाणी पुरवठ्यात इंधनाचा अडसर

By admin | Updated: July 13, 2015 00:36 IST

जत तालुक्यातील स्थिती : पेट्रोलपंप चालकांकडून उधारी बंद; वेळेत पाणी मिळेना!

जयवंत आदाटे - जत -तालुक्यातील तीन गावांत चार शासकीय टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परंतु या चार टॅँकरमध्ये डिझेल घालण्यावरून वेळोवेळी वाद निर्माण होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून पेट्रोलपंप चालकांना डिझेलची बिले वेळेत अदा केली जात नसल्याने पेट्रोलपंप चालकांनी उधारीवर डिझेल देणे बंद केले आहे. यामुळे टॅँकरमध्ये डिझेल घालणार कोण?, या वादातून अनेकदा गावामध्ये टॅँकरद्वारे वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.उमराणी गावात दोन व खोजानवाडी आणि अमृतवाडी गावात प्रत्येकी एक याप्रमाणे चार शासकीय टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. खासगी टॅँकरसाठी भाड्यामध्ये डिझेलचे बिल धरून एकत्रित बिल काढले जात आहे. शासकीय टॅँकरसाठी भाडे आकारले जात नाही, परंतु त्यासाठी डिझेलची तरतूद करणे आवश्यक असते.यापूर्वी जत शहरातील एका पेट्रोल पंपावर शासनाचे उधारी खाते घालून टॅँकरचालकास ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून पावती दिली जात होती. टॅँकरचालक पेट्रोलपंप मालकास ही पावती दाखवून टॅँकरमध्ये डिझेल भरून घेत होते. त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर पेट्रोलपंप मालकास शासनाकडून एकत्रित बिल दिले जात होते. परंतु मागील दोन-तीन वर्षात शासनाकडून पेट्रोलपंप मालकांना वेळेत बिल दिले नाही. आठ-दहा महिने हेलपाटे मारून झाल्यानंतर त्यांना त्यांचे थकित बिल मिळाले आहे. या कारणामुळे यावर्षी जत शहरातील एकाही पेट्रोलपंप मालकाने पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय टॅँकरला उधारीवर डिझेल दिले नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप मालकांची भेट घेऊन त्यांना उधार देण्याची विनंती केली असता ते म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त एक ते दीड महिना उधार देऊ, त्यानंतर उधार देणे शक्य होणार नाही. तालुका पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे जत शहरातील पेट्रोल पंपावर शासकीय टॅँकरसाठी डिझेल मिळेनासे झाले आहे, असा आरोप पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावातील नागरिकांमधून केला जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या शासकीय टॅँकरसाठी डिझेलचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक तरतूद असते. परंतु त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून वेळेवर अनुदान उपलब्ध होत नाही. त्यामुळे पेट्रोलपंप मालकांना त्यांचे थकित बिल वेळेवर देता येत नाही, अशी शासकीय अधिकारी खंत व्यक्त करत आहेत. शासन पाणीटंचाई कामात हयगय करत नाही, अशी घोषणा वेळोवेळी केली जात असली तरी, ती फसवी आहे, असा आरोप अमृतवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पवार यांनी केला आहे. (वार्ताहर)लोकवर्गणीतून इंधनाचा खर्चपाणी पुरवठा करणारा टँकरचालक, गावातील ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा करून, ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडून गरज भासेल तसे वेळोवेळी रोख पैसे घेऊन सध्या टॅँकरमध्ये डिझेल घालून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.शासनाने पाणीटंचाईसाठी वेळेवर निधी उपलब्ध करून दिला, तर लोकवर्गणी जमा करून पाणी पुरवठा करण्याची वेळ जत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर यापुढे येणार नाही.