शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

कुपवाड एमआयडीसीतील कंपनीची चीनच्या कंपनीकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST

कुपवाड : खरेदी केलेल्या हायड्रॉलिक जॅक पंप युनिटचे पैसे न देता चीनच्या मे. टी. मरीन मेकॅनिकल कंपनीने कुपवाड एमआयडीसीतील ...

कुपवाड : खरेदी केलेल्या हायड्रॉलिक जॅक पंप युनिटचे पैसे न देता चीनच्या मे. टी. मरीन मेकॅनिकल कंपनीने कुपवाड एमआयडीसीतील पेंटागॉन इंडस्ट्रीज कंपनीची १२ लाख २९ हजार ८८ रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.१९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यान ही फसवणुकीची घटना घडली. याप्रकरणी चीनमधील मे. टी. मरीन मेकॅनिकल कंपनी, नानतोंग व बारलेक्स बँकेचे पदाधिकारी आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुपवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुपवाड एमआयडीसीमध्ये पेंटागॉन इंडस्ट्रीज ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीकडून चीनमधील मे. टी. मरीन मेकॅनिकल कंपनीने हायड्रॉलिक जॅक प्रोलेक्ट डब्ल्यू ३२ एल. ऑईल पंपची १४८ युनिट १२ लाख २९ हजार ८८ रुपयांना खरेदी केली होती. त्यानुसार पेंटागॉन इंडस्ट्रीजने संबंधित कंपनीकडे पैशाची मागणी केली. मात्र, चीनमधील कंपनीकडून त्यांना बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने पैसे जमा केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पेंटागॉन कंपनीच्या खात्यावर पैसे जमा झालेच नाहीत. १९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२० दरम्यान ही फसवणुकीची घटना घडली. याबाबत पेंटागॉन कंपनीकडून वारंवार पैशासाठी पाठपुरावा करण्यात आला. तरीही पैसे मिळत नसल्याने अखेर पेंटागॉन कंपनीने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात चीनच्या कंपनीविरोधात फिर्याद दिली आहे. ही फिर्याद कंपनीचे अकौंटंट मिलिंद मोहन सावंत यांनी दिली असून, चीनच्या कंपनीबरोबरच बारलेक्स बँक, खरेदी-विक्री व्यवहारातील अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे तपास करीत आहेत.