शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

चार जागांमध्ये अडले बिनविरोधचे घोडे

By admin | Updated: May 12, 2016 00:15 IST

वसंतदादा कारखाना निवडणूक : विशाल पाटील बिनविरोध; १८ उमेदवारांनी घेतली माघार

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीचे घोडे केवळ चार जागांमुळे अडले आहे. सत्ताधारी गटाने प्रयत्न केल्यानंतरही अनेकांनी हटवादी भूमिका स्वीकारल्याने निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. उत्पादक गटातून कारखाना अध्यक्ष विशाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून अन्य गटातील उमेदवारांची यादी त्यांनी बुधवारी जाहीर केली. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. कारखाना कार्यक्षेत्र चार तालुक्यांतील १६२ गावांमध्ये विखुरलेले आहे. सर्व गावांमधील कारखान्याच्या व्यक्ती उत्पादक सभासदांचा एक मतदारसंघ, याप्रमाणे पाच गट तयार केले आहेत. या पाच गटातून प्रत्येकी तीन, याप्रमाणे १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यानंतर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक व पणन संस्था मतदार संघ क्र. २ मधून १, अनुसूचित जाती, जमातीतून १, महिला २, इतर मागासवर्गीय १, भटक्या विमुक्त, विशेष मागास प्रवर्गामधून १, असे संचालक निवडून द्यायचे आहेत. चार जागांसाठी अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांच्या प्रयत्नात सत्ताधारी गटास १७ जागांवर बिनविरोधची चर्चा यशस्वी करता आली. अद्याप काही जागांवर घोडे अडले आहे. (प्रतिनिधी)उमेदवारी अर्ज : १८ जणांची माघारबुधवारी एकूण १८ उमेदवारांनी माघार घेतली. उत्पादक गटातून लक्ष्मण घारगे, आदिनाथ मगदूम, माणिक पाटील, अविराजे शिंदे, जनार्दन पाटील, संभाजी पाटील, दिलीप पवार, सुरेश पाटील, उमेश पाटील, गणेश पाटील यांनी, अनुसूचित जाती गटातून प्रकाश कांबळे, रामचंद्र मोरे, शामराव ढोबळे यांनी, महिला गटातून जयश्री पाटील यांनी, तर भटक्या जाती गटातून सचिन कोळी यांनी माघार घेतली.