शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवस झाले तरी, फडणवीसांचा निरोप नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ...

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार संजयकाका पाटील आणि भाजपच्या नाराज सदस्यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी दोन दिवसांत नेत्यांकडे निरोप देतो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र चार दिवस झाले तरीही फडणवीसांचा निरोप आलेला नाही. त्यामुळे पदाधिकारी बदलाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात भाजपमध्ये खासदार पाटील विरुद्ध भाजपमधील अन्य नेते अशी दुफळी पडली आहे. यामुळेच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल लांबणीवर पडला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना पदाधिकारी बदल नको आहे. पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे महापालिकेत झाले, ते जिल्हा परिषदेत होऊ नये, असे त्यांना वाटते. जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारीमध्ये आहेत. त्यांना सामोरे जातांना जिल्ह्याच्या सत्तेचे राजकीय केंद्र असलेली जिल्हा परिषद हातून जाऊ नये, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार त्यांनी पदाधिकारी बदल नकोच, अशी भूमिका फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे.

खासदार पाटील मात्र जिल्हा परिषदेतील बदलावर ठाम आहेत. भाजपच्या सदस्यांची नाराजी दूर करणे गरजेचे आहे. नाही तर आगामी निवडणुकीत याचा वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका खा. पाटील यांनी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे चार दिवसापूर्वी फडणवीस यांनी दोन दिवसांत भाजप नेत्यांकडे निरोप देतो, सांगितले होते. पण, दोन दिवसांचे चार दिवस उलटून गेले तरी फडणवीसांचा निरोप आलेला नाही. यावरून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाणार की केवळ टोलवाटोलवी करून वेळ मारून नेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.

चौकट

राजीनामे घेण्याबाबत निरोप नाही : पृथ्वीराज देशमुख

जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे पदाधिकारी बदलास विलंब झाला आहे. काही नाराज सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांनी जिल्ह्यातील नेत्यांना निरोप देतो, असे म्हटल्याचे त्या नाराज सदस्यांकडूनच समजले. अद्याप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेण्याबाबत कोणताच निरोप आलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.