शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

चोवीस योजनांमध्ये चार कोटींचा घोटाळा

By admin | Updated: February 4, 2015 00:05 IST

मालमत्तेवर बोजा चढविणार : पाणीपुरवठा समिती अध्यक्ष, सचिव, तांत्रिक सेवा पुरवठादारांवर ठपका

अशोक डोंबाळे - सांगली -जत तालुक्यातील २४ गावांमधील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव आणि तांत्रिक सेवा पुरवठादारांनी ३ कोटी ९० लाखांचा घोटाळा केला आहे. तशी जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून शासकीय रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केला आहे. दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव जाणार असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले. संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवून घोटाळ्यातील रक्कम वसुलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात होणारी ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.पाणी योजनांच्या प्रश्नांवर विधानसभेत ‘लक्षवेधी’ मांडण्यात आली होती. जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दक्षता समितीच्या सभेतही पाणी योजनांमधील घोटाळ्यावरून आमदार, खासदारांनी प्रशासनाचे वाभाडे काढले होते. खा. संजयकाका पाटील यांनी तर पाणी योजनांमध्ये घोटाळा करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप केला होता. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी पाणी योजनेतील घोटाळेखोरांची यादी तात्काळ देण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार जत तालुक्यातील २४ गावांमधील अपूर्ण योजना आणि घोटाळ्यांचा अहवाल तयार करण्यात आला. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जत तालुक्यातील २४ गावांमध्ये ३ कोटी ९० लाखांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात संबंधित गावातील पाणीपुरवठा समिती आणि सामाजिक लेखा परीक्षण अध्यक्ष, सचिव, तांत्रिक सेवा पुरवठादार यांच्यावर ठपका ठेवला गेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी संबंधित २४ गावांमधील समिती अध्यक्ष, सचिव, तांत्रिक सेवा पुरवठादारांच्या १९ मे २०१४, १९ नोव्हेंबर २०१४, २८ जानेवारी २०१५ अशा तीन बैठका घेतल्या होत्या. या गावांना प्रत्येकवेळी तीन महिन्यांची मुदत देऊन कामे पूर्ण न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा दिला होता. तरीही अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. शेवटी संबंधित गावच्या पाणीपुरवठा व सामाजिक लेखा परीक्षण समितीचे अध्यक्ष, सचिवांवर तीन कोटी ९० लाखांवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्यात यावी, असा प्रस्ताव जि.प.ने तयार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.चार गावांकडून ३७ लाख वसूल होणार जलस्वराज्य योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून कामे न करताच अपहार केल्याप्रकरणी चार गावांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून ३७ लाखांची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. सोमवार, दि. ९ रोजी सातारा जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या लवादाकडे हा प्रस्ताव देण्यात येणार आहे. यामध्ये ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे दहा लाखांचा अपहार झाल्याचे त्रयस्थ संस्थेने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. यामुळे ग्रामसभेने अपहाराची रक्कम रद्द करण्याचा ठराव करूनही त्याला कोणताही अर्थ नसणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जत तालुक्यातील मुचंडी येथे पाच लाख, माडग्याळ दहा लाख आणि रेवनाळमध्ये बारा लाखांचा घोटाळा पाणी पुरवठा समिती अध्यक्ष आणि सचिवांकडून झाला आहे. ग्रामसभेनेही घोटाळा वसूल करण्याचा ठराव केल्यामुळे संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवून ती रक्कम वसूल होणार आहे.गावे आणि घोटाळ्यातील रक्कमगावेघोटाळा (आकडे लाखात)गिरगाव६.७९पांढरेवाडी२२.३५औंढी१८.०७ कंठी१६.१५भिवर्गी५४.३५धुळकरवाडी६९.६३ गोंधळेवाडी७८.६७ हळ्ळी५.८२ करेवाडी (तिकोंडी)७.९२ खंडनाळ३.१४ लकडेवाडी७.८८लमाणतांडा (उटगी)६.३७सोनलगी४.९२गावेघोटाळा (आकडे लाखात)सुसलाद६.०४खिलारवाडी५.८५गुगवाड४.३४वायफळ११.५७घोलेश्वर५.०१निगडी खु.१९.१६जिरग्याळ८.७२साळमाळगेवाडी ६.६८वळसंग१५.८९लमाणतांडा २.८९(दरीबडची)जालिहाळ२.४४एकूण३.९० कोटी