शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

माजी पदाधिकाऱ्यांनाही हवी पुन्हा संधी

By admin | Updated: January 16, 2016 00:32 IST

तासगावला अध्यक्षपद : जयंतरावांनी घेतल्या मुलाखती

सांगली : जिल्हा परिषदेतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी, नवीन पदाधिकारी निवडीतही संधी देण्याची मागणी शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे केली. तासगावातील अध्यक्षपदाच्या दावेदारांनी तालुका नेत्यांमार्फत शिफारशी केल्या. परंतु, नवीन चेहऱ्यांनाच संधी देण्याचा निर्णय झाला आहे. तासगावला अध्यक्षपद मिळणार असून सर्व अधिकार आमदार सुमनताई पाटील यांना दिले आहेत.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ३१ सदस्य आणि दोन सहयोगी सदस्यांची आमदार पाटील व जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी बैठक घेतली. नवीन निवडीबद्दल सर्वच सदस्यांची मते जाणून घेतली. तालुकानिहाय सर्व सदस्यांना एकत्रित बोलावण्यात आले होते. जत तालुक्यातील सहा सदस्यांनी, आपल्यापैकी कोणालाही संधी देण्याची मागणी केली. आटपाडी तालुक्यातून चार सदस्य निवडून येऊनही तेथे दोन सभापतीपदे दिली, त्यामुळे जतला पुन्हा एकदा पद देण्याची त्यांनी मागणी केली. आटपाडीतून कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा तानाजी पाटील व समाजकल्याण सभापती उज्ज्वला लांडगे यांनी पुन्हा दावेदारी केली. खानापूर तालुक्यातील माजी समाजकल्याण समिती सभापती किसन जानकर व लेंगरे गटाचे सदस्य फिरोज शेख यांनीही पद मागितले आहे. मिरज तालुक्यातून आप्पासाहेब हुळ्ळे, राजेंद्र माळी यांनी, नेते सांगतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले. भीमराव माने यांनी मात्र उपाध्यक्ष पदाची संधी देण्याची मागणी केली. त्यावर ‘पूर्वी उपाध्यक्षपद देतेवेळी का घेतले नाही?’, अशी विचारणा नेत्यांनी केली. वाळवा, शिराळा तालुक्यातील सर्वच सदस्यांनी जयंत पाटील घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले. तासगाव तालुक्यातील पाच सदस्य राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले असून एक अपक्ष आहे. येथील योजना शिंदे, कल्पना सावंत, शुभांगी पाटील, स्नेहल पाटील यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. तासगाव तालुक्यास अध्यक्षपद देण्याचे निश्चित असून तुम्ही एकत्रित निर्णय घेऊन काय ते सांगा. अध्यक्षपद निवडीचे सर्व अधिकार आ. सुमनताई पाटील यांना दिल्याचेही नेत्यांनी सांगितले. कवठेमहांकाळ तालुक्यातील सदस्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांचा एक विधानसभा मतदारसंघ असला तरी, कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र पद देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)मूळच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णयराष्ट्रवादीच्या चिन्हावर सदस्य निवडून आले आहेत. यामुळे त्यांचे नेते कुठेही असले तरी, सदस्य आमचेच आहेत. पदाधिकारी बदलामध्ये कोणतीही ‘गंमत’ होणार नाही. मागील निवडीवेळी जे नेते राष्ट्रवादीबरोबर होते आणि सध्या ते अन्य पक्षात आहेत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर या नेत्यांशी चर्चा करून पदाधिकाऱ्यांची नावे चार दिवसात निश्चित करणार आहे, अशी माहिती विलासराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.