शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जंगलांच्या आगी वन्यजीवांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST

बाबासाहेब परिट लोकमत न्यूज नेटवर्क बिळाशी : शिराळा तालुक्यात जंगलांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही विघ्नसंतोषी लोक ...

बाबासाहेब परिट

लोकमत न्यूज नेटवर्क

बिळाशी : शिराळा तालुक्यात जंगलांना आगी लावण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही विघ्नसंतोषी लोक जंगलाला आग लावत आहेत. परंतु, त्यांचा शोध घेणे वन विभागाला अवघड जात आहे. वणव्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असून, त्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्यामुळे बिबटे व गवे लोकवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढत आहे.

गेल्या वर्षभरात लोकवस्तीत बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मांगले परिसरात काही बिबट्यांच्या पिलांचा तसेच पूर्ण वाढ झालेल्या एका बिबट्याचा खुजगावच्या जलसेतूवरून पडून मृत्यू झाला. शिराळा तालुक्यात दोन-चार दिवसांनी बिबट्याने शेळी व श्वान मारल्याच्या घटना गेल्या वर्षभरात सातत्याने घडत आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे आरक्षित केलेल्या जंगलाव्यतिरिक्त आरळा-गुढे पाचगणी पठार ते शेडगेवाडी फाट्यापर्यंतचा परिसर हा जंगलव्याप्त आहे. पावलेवाडीपर्यंत डोंगरावर बऱ्यापैकी झाडी आहे. परंतु, गेल्या काही वर्षात या जंगलांना बिबट्याच्या वावराच्या भीतीपोटी काही नागरिक आगी लावत आहेत. यामुळे बिबट्याचा वावर जंगलापेक्षा शिवारातील ऊसात व नदीकाठावरील परिसरातच जास्त असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या महिन्याभरापूर्वी बिऊर परिसरात बिबट्या एका लहान मुलाला घेऊन गेल्याची घटना घडली होती. स्वतःच्या हक्काचा अधिवास माणसाच्या हस्तक्षेपाने उद्ध्वस्त झाल्यामुळे बिबट्या व रानगवे यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवला आहे. याबाबत जंगलाचे अस्तित्व वाचवणे व वणव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी दीर्घ पल्ल्याचे कॅमेरे बसवण्याची गरज आहे. वणवे लावणार्‍यांवर कारवाई करून नैसर्गिक अधिवास वाढवल्यास रानगवे व बिबट्यांपासून होणारा त्रास थांबणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कोट

वणवा लागल्यानंतर जमिनीतील चौदा प्रकारची अन्नद्रव्ये नष्ट होतात. मौल्यवान खाद्य प्रजातीचे गवत नष्ट होते. नैसर्गिकरित्या कंपोस्ट खत निर्मिती थांबते. वणव्यांमुळे अन्नसाखळी तुटते.

- जी. एच. लंगोटे, वनक्षेत्रपाल, चांदोली अभयारण्य.

कोट

वणव्यांमुळे सरपटणारे प्राणी नष्ट होत आहेत. प्रदूषणातही वाढ होत आहे. पक्ष्यांची घरटी नष्ट होऊन मधमाशांची पोळी जळतात. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे.

- डी. के. यमगर, वनपाल, चांदोली अभयारण्य.