शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात वन विभागाचा अजब कारभार

By admin | Updated: January 18, 2016 00:34 IST

तीन बंधाऱ्यांसाठी एकच रक्कम : शिवाजीराव नाईक यांची चौकशीची मागणी

विकास शहा -- शिराळा शासकीय अधिकारी काहीही करु शकतात. अगदी असेच एक जागतिक आश्चर्य करण्यात आले आहे, वन विभागातील मातीच्या तीन वेगवेगळ्या बंधाऱ्यांच्या अंदाजपत्रकामध्ये! तीन वेगवेगळ्या गावात बांधण्यात येणाऱ्या तीन मातीच्या बंधाऱ्यांची अंदाजपत्रकात रक्कम आहे ९ लाख ९५ हजार ११४ रुपये. म्हणजे एकाही रुपयाचा फरक करण्यात आलेला नाही. बांधकामाबाबत चक्क जागतिक दर्जाच्या अभियंत्याने ठरविले तरीही असे एकसारखे बांधकाम तो करु शकणार नाही. मात्र हे दिव्य शासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. या घटनेबाबत आ. शिवाजीराव नाईक यांनी अर्थ-नियोजन मंत्री, वनमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. शिराळा तालुक्यात वन विभागामार्फत कुसाईवाडी, अस्वलवाडी आणि धसवाडी याठिकाणी ९ लाख ९५ हजार ११४ रुपये अंदाजपत्रके असणारे तीन मातीचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी निविदा मागविण्यात आल्या. हे तीन बंधारे बांधण्याची ठिकाणे वेगवेगळी आणि वेगवेगळ्या भौगोलिक रचना असणारी आहेत. तसेच बंधारे बांधण्यात या बंधाऱ्याच्या पायाची स्थिती, आकारमान हे वेगवेगळे असते. त्याचबरोबर लांबी, रुंदीही वेगळी असते. अगदी एक- दोन फुटाच्या अंतरावर जमिनीबाबत एकसारखेपणा नसतो. त्यामुळे बांधकाम करताना याच्या अंदाजपत्रात काहीवेळा लाखो रुपयांचा फरक पडतो.मात्र या तीन वेगवेगळ्या गावात बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यांबाबत एकाही रुपयाचा अंदाजपत्रकात फरक नाही. जर अशाप्रकारे एकसारखे अंदाजपत्रक असणारे बंधारे एकाच खर्चात पूर्ण झाले, तर हे जगातील आणखी एक आश्चर्य होईल. हे झाले स्थापत्य विभागाचे काम. त्यानंतर या कामासाठी ठेकेदारांनी निविदा भरल्या. यातील एक निविदा चक्क ४५ टक्के कमी दराने ५ लाख ४७ हजार ३१३ रुपये दराने! त्यामुळे या कामाचे गौडबंगाल काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला हा ठेका मिळणार आहे. तिन्ही गावांची भौगोलिक स्थिती, जमिनीचा स्तर वेगवेगळा असताना, या कामाचे एकाच रकमेचे अंदाजपत्रक तयार कसे झाले?, असा सवालही उपस्थित केला जात आहे.आ. नाईक यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे या तीनही कामांचे अंदाजपत्रक तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करू, तसेच जर ४५ टक्के कमी रकमेने काम करणारा हा ठेकेदार अत्यंत निकृष्ट पद्धतीने काम करण्याची शक्यता आहे किंवा ही अंदाजपत्रके मुद्दाम वाढवलेली असली पाहिजेत. त्यामुळे या तिन्ही कामांच्या फेरनिविदा काढाव्यात, तसेच तिन्ही कामांच्या ठिकाणी जाऊन वस्तुनिष्ठ पाहणी करुन अंदाजपत्रके तयार करावीत, अशी मागणी केली आहे.अशा आहेत त्रुटी : फेरनिविदेची मागणी कुसाईवाडी, अस्वलवाडी, धसवाडी याठिकाणी मातीच्या बंधाऱ्याची एकाच रकमेची अंदाजपत्रके ठेकेदाराने ४५ टक्के कमी दराने काम करण्याची निविदा दाखलयात अंदाजपत्रकात रक्कम वाढविली असावी किंवा ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होण्याची शक्यताआ. नाईक यांच्याकडून या अधिकाऱ्याची चौकशी करण्याची व फेरनिविदा काढण्याची मागणी