शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी झुंबड

By admin | Updated: October 23, 2014 00:05 IST

बाजारपेठ फुलली : फुलांच्या खरेदीसाठी सांगलीत गर्दी, मागणी वाढल्याने झेंडू ६० रुपये किलो

सांगली : लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. पूजेचे साहित्य, फळे आणि फुलांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. येथील कापड पेठ, दत्त-मारुती रोड, सराफ कट्टा आदी रस्त्यावर विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. दरम्यान, आज झेंडू फुलांचा दर ६० रुपये किलो होता. येथील रिसाला रोड, शिवाजी मंडई, कापड पेठ, दत्त-मारुती रोड, विश्रामबाग, गणपती पेठ आदी रस्त्यांवर फुले विक्रेत्यांनी फुलांचे ढीग लावले आहेत. आष्टा, वाळवा, तुंग या परिसराबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आपली फुले विक्रीसाठी याठिकाणी आणली आहेत. सकाळी ७० रुपये किलो असणारा झेंडूचा दर सायंकाळी ६० रुपये किलो झाला होता. नारळाच्या झावळ्या, केळीचे खुंट, ऊस, आंब्याचे डहाळे आदी खरेदीसाठीही गर्दी होती. झावळ्या ५० रुपये, तर केळीचे खुंट ४० ते ५० रुपये जोडी अशी विक्री चालू होती. ऊस जोडी २० रुपये, तर आंब्याचा डहाळा दोन रुपये अशी विक्री सुरु होती. रांगोळी, पूजेचे साहित्य, फुले खरेदीलाही गर्दी होती. रांगोळी दहा ते वीस रुपये किलो अशी विक्री सुरु होती. सफरचंद, पेरू, चिक्कू, डाळिंब, कवठ आदी फळांनाही मागणी होती. फळांची विक्री ५० ते ८० रुपये किलो अशी सुरु होती. भेंड, बत्तासे, लाह्या यांच्या विक्रीसाठी विक्रेत्यांनी रस्त्यावर स्टॉल लावले आहेत. सुशोभिकरणासाठी विद्युत माळांनाही आज मागणी होती. विद्युत माळा शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत विक्रीस होत्या. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत गर्दी होती. (प्रतिनिधी)