शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST

इस्लामपूर : बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात इस्लामपुरातील राष्ट्रवादीचे संजय पाटील यांनी सहकार पॅनेलमधून विजयश्री खेचून आणली, तर संस्थापक पॅनेलचे उमेदवार ...

इस्लामपूर : बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात इस्लामपुरातील राष्ट्रवादीचे संजय पाटील यांनी सहकार पॅनेलमधून विजयश्री खेचून आणली, तर संस्थापक पॅनेलचे उमेदवार शिवाजी पवार यांनी पराभव मान्य केला. इतर राखीव गटातील ‘रयत’चे उमेदवार माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनीही कौल मान्य केला.

बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटात इस्लामपूर येथील संजय पाटील यांनी सहकार पॅनेलमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि बाजी मारली. इतर राखीव गटामधून आनंदराव मलगुंडे यांनी ‘रयत’मधून लढत दिली. त्यांच्या विरोधातील सहकार पॅनेलच्या अविनाश खरात (खरातवाडी) यांनी विजयाचा गुलाल उधळला. याच गावातील संस्थापक पॅनेलचे नितीन खरात यांचाही पराभव झाला.

रयत आणि संस्थापक यांच्या मनोमिलनाचे गुऱ्हाळ वेळेत संपले नाही. त्यामुळे प्रचाराला वेळ कमी मिळाला. शिवाय विरोधी पॅनेलच्या धनशक्तीपुढे आमचा टिकाव लागला नसल्याची प्रतिक्रिया देत आनंदराव मलगुंडे यांनी कौल मान्य केला.

शहरात सहकार पॅनेलने आघाडी घेताच संजय पाटील यांच्या समर्थकांनी उरुण परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून मिरवणूक काढली. त्यानंतर आष्टा नाका येथे जाऊन राजारामबापू पुतळ्यास अभिवादन केले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, इस्लामपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संदीप पाटील, विजयभाऊ पतसंस्थेचे अध्यक्ष शिवराज पाटील आदी उपस्थित होते.