शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगाचा निधी लाटल्यावरून गोंधळ

By admin | Updated: July 31, 2014 00:06 IST

जिल्हा परिषद सभा : काँग्रेस सदस्यांच्या आरोपाने पदाधिकारी संतप्त, आयत्यावेळच्या विषयात गोलमालचा आरोप

सांगली : जिल्हा परिषदेला तेराव्या वित्त आयोगातून आलेल्या निधीवरील व्याजाची रक्कम सदस्यांना विश्वासात न घेताच पदाधिकारी आणि राष्ट्रवादी सदस्यांनी लाटल्याचा आरोप काँग्रेसचे सदस्य सूर्यकांत मुटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. सदस्यांच्या आरोपावरून पदाधिकाऱ्यांचा पाराही वाढला. अध्यक्ष, उपाध्यक्षांनी आम्ही तो निधी विकास कामांवर खर्च केला असून, तो लाटला नसल्याचे सांगितले. अध्यक्ष देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेत काँग्रेसचे मुटेकर म्हणाले की, तेराव्या वित्त आयोगातील निधीवरील व्याजाची रक्कम विकास कामासाठी सर्व सदस्यांना देण्याचा निर्णय झाला होता. तरीही तो निधी खर्च करताना आम्हाला विश्वासात का घेतले नाही. तो निधी परस्पर पदाधिकारी आणि काही मोजक्याच सदस्यांनी का लाटला, असा सवाल करून पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर देवराज पाटील, बसवराज पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून ‘लाटले’ या शब्दावर आक्षेप घेतला. आमच्या घरात निधी खर्च केला नाही. सदस्यांनी जपून शब्द वापरावेत, असे त्यांनी सुनावले. राष्ट्रवादी सदस्यांनीही या शब्दावरून काँग्रेसच्या सदस्यांवर टीका केली. शेवटी सदस्य रणधीर नाईक यांनी हस्तक्षेप केला. मुटेकर यांना शब्दश: कोंडीत पकडू नका, त्यांची भावना समजून घ्या, असे आवाहन करून वादावर पडदा टाकला. पवित्रा बरगाले यांनीही याच विषयावरून जाब विचारला. सभेत आयत्यावेळी विषय घुसडून गोलमाल केला जात असल्याचा आरोप सुरेश मोहिते यांनी केला. तसेच जिल्हा परिषद मालकीच्या ६६ जागांपैकी १७ ठिकाणांची अतिक्रमणे काढली नाहीत. याबद्दल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही सदस्यांनी केला.रणधीर नाईक यांनी ग्रामपंचायतीच्या दफ्तरांची वर्षानुवर्षे तपासणीच होत नाही. म्हणूनच लाखो रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी सांगितले की, तपासणी होती का नाही, याची माहिती घेतली जाईल. विस्तार अधिकारी तपासणी करणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. घोटाळ्याप्रकरणी चौकशी समिती नेमली जाते. पण, चौकशीच वेळेत होत नाही. अपहाराची रक्कमही वसूल होत नसल्यामुळे घोटाळे करणाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुशच राहिला नसल्याचा आरोपही रणधीर नाईक, सुरेश मोहिते यांनी केला. यावर लोखंडे यांनी, तांदुळवाडी पाणी योजनेतील घोटाळा, येळावी (ता. तासगाव) येथील मृतांच्या नावावर लाभ दिल्याचे प्रकरण व पशुसंवर्धन विभागातील औषध साठ्याप्रकरणी केलेल्या कारवाईचा दाखला दिला. (प्रतिनिधी)