शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

By admin | Updated: September 20, 2016 00:04 IST

चंद्रकांतदादा पाटील : कवठेमहांकाळला मध्यवर्ती प्रशासकीय भवनचे उद्घाटन

कवठेमहांकाळ : सरकारने सेवा हमी विधेयक तयार केले असून, जनतेच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेला वेळेत सुविधा द्याव्यात, जेणेकरून गुन्हे दाखल करण्याची वेळच येणार नाही, अशी सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. डिसेंबरअखेर महाराट्रात दहा हजार कोटींचे रस्ते होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.येथील महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने उभारलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय भवनाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार संजय पाटील होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता जाधव आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले की, आमच्या सरकारने अर्धवट स्थितीतील बांधकामे पूर्ण व्हावीत व ज्या हेतूने ती उभारली आहेत, तो उद्देश सफल व्हावा, यासाठी सकारात्मक काम सुरू केले आहे. त्याचबरोबरच सर्वसामान्य जनतेला चांगल्या व वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी सेवा हमी विधेयक आणले आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित दाखले किती कालावधित द्यायचे, याबाबत माहिती दिली आहे. सुमनताई पाटील म्हणाल्या की, आर. आर. आबांच्या प्रयत्नामुळे ही इमारत मंजूर झाली असून ती पूर्णत्वास आली आहे. यामुळे आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तालुक्यातील विविध कामांची मागणी पालकमंत्री या नात्याने आपल्याकडे केली असून, ती काम आपण लक्ष घालून पूर्ण करावीत, अशी मागणी केली.गायकवाड यांनी, प्रशासकीय भवनातून जनतेला चांगल्या सेवा मिळतील, असा विश्वास दिला.खा. संजय पाटील म्हणाले, मध्यवर्ती प्रशासकीय भवनातून सर्वसामान्य जनतेला चांगल्या व दर्जेदार सुविधा द्याव्यात. म्हैसाळ योजनेचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत केला आहे. यासाठी निधी मिळणार असून उर्वरित कामांसाठी निधी द्यावा. यावेळी प्रा. भाऊसाहेब पाटील, पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, ‘महांकाली’चे अध्यक्ष विजय सगरे, निवृत्त कर्नल संपतराव साळुंखे, अनिल लोंढे, मिलिंद कोरे, आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, गणपती सगरे, अनिल शिंदे, गजानन कोठावळे, दादासाहेब कोळेकर, उपसभापती जगन्नाथ कोळेकर आदी उपस्थित होते. आभार तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मानले. (वार्ताहर)मोर्चासाठी शासकीय सुटीची मागणीकवठेमहांकाळ येथे कार्यक्रमानिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आले असता, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने त्यांना, मंगळवारी, २७ सप्टेंबरला मराठा समाज क्रांती मोर्चाला समाजबांधवांना हजर राहता यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना यादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मराठा समाज क्रांती मोर्चाच्या बांधवांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.