शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कोरोनाशी लढायचं की महागाईशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST

सांगली : एकीकडे कोरोनाशी दोन हात करीपर्यंत सर्वसामान्यांच्या तोंडाला फेस आलेला असताना त्यावर महागाईचा वरवंटाही जोराने फिरू लागला आहे. ...

सांगली : एकीकडे कोरोनाशी दोन हात करीपर्यंत सर्वसामान्यांच्या तोंडाला फेस आलेला असताना त्यावर महागाईचा वरवंटाही जोराने फिरू लागला आहे. गेल्या वर्षभरात सर्व अत्यावश्यक वस्तूंची भरमसाट दरवाढ झाली आहे. खाद्यतेल थेट दुपटीने महागले असून, किराणा सामानाचे दरही वाढले आहेत. त्याशिवाय गॅस, बांधकाम साहित्य, इंधन यांचे दरही कंबरडे मोडून टाकणारे ठरले आहेत.

एकीकडे उत्पन्न थांबलेले आणि दुसरीकडे दैनंदिन खर्च वाढलेला असा दुहेरी हल्ला सुरू आहे. रेशनिंगवर मिळणारा गहू-तांदूळ जनावरांनी खाण्याच्या दर्जाचा आहे. कोरोनाकाळात चैनी बाजूला ठेवली तरी किमान पोट भरण्यासाठी तरी खटाटोप करावाच लागत आहे; पण सातत्याने भडकणाऱ्या किमतींपुढे हार मानावी लागत आहे.

चौकट

पेट्रोल-डिझेलची चर्चा; खाद्यतेलाचे काय?

पेट्रोलच्या किमती शंभरी गाठत असल्याचा गाजावाजा जोरात आहे; पण या गदारोळात खाद्यतेले मात्र दीडशे रुपयांपर्यंत पोहोचल्याकडे दुर्लक्ष झाले. गेल्या वर्षी मार्चमध्ये ११० ते १३० रुपये किलो मिळणारे शेंगतेल आता १७० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ६५ रुपयांचे पामतेल ९० ते १००; तर ७५ ते ८५ रुपयांचे सूर्यफूल तेल १५० ला विकत घ्यावे लागत आहे. किराणा सामानामध्ये खाद्यतेलाची दरवाढ सर्वाधिक आहे.

चौकट

सहाजणांच्या कुटुंबाचे बजेट... मार्च २०२० आणि मार्च २०२१

२०२० २०२१

किराणा ६५०० ९०००

दूध १५०० १५००

भाजीपाला १५०० २२००

फळे ५०० ८००

गॅस ६०० ८००

बेकरी १००० १३००

पेट्रोल (दोन दुचाकी) ४५०० ६०००

वीज बिल १४०० १६००

मोबाईल रिचार्ज (४ मोबाईल) १६०० २०००

टीव्ही रिचार्ज ३५० ३५०

आयुर्विमा हप्ता (दोघांचा) १२०० १२००

अैाषधे १५०० ३०००

पाणी बिल, स्टेशनरी व इतर ३००० ४०००

एकूण - २५,१५० ३३,७५०

चौकट

सिमेंट, सळी, वाळूची ५० टक्के दरवाढ

मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या बांधकाम क्षेत्रानेही महागाईपुढे हात टेकले आहेत. सिमेंटच्या अवाजवी दरवाढीविरोधात तीन महिन्यांपूर्वी बांधकाम क्षेत्राने एक दिवसाचा देशव्यापी बंदही पाळला होता. बांधकाम साहित्याची दरवाढ अशी :

मार्च २०२० मार्च २०२१

सिमेंट २८० रुपये ३६० रुपये

सळी प्रतिटन ४८ हजार ६४ हजार

कृत्रिम वाळू प्रतिब्रास ३८०० ४५००

चौकट

पेट्रोल, डिझेल, गॅसची महागाई कंबरडे मोडणारी

मार्च २०२० मार्च २०२१

पेट्रोल ७६.१५ ९८.९५

डिझेल ६६.२० ८९.३५

गॅस ६१० ७९५

कोट

कोरोना व लॉकडाऊनमुळे पामतेलाची आयात थांबली. त्यामुळे इतर तेलांचे दर वेगाने वाढत गेले. अन्य खाद्यतेलांचा पुरवठाही कमी झाल्याने तेलांचा दर १५० रुपयांपर्यंत पोहोचला. आमच्यासाठीदेखील ही दरवाढ चकित करणारी आहे. दिवाळीपर्यंत आणखी दरवाढ होऊ शकते. पामतेलाची आवक वाढल्यास अन्य तेलांच्या किंमतींना शह बसू शकतो.

- गजेंद्र कुल्लोळी, तेल व्यापारी, मिरज

कोट

घरचे उत्पन्नच कमी झाल्याने काटकसर करावी तेवढी थोडीच आहे. बाजारपेठा बंद असल्याने हॉटेलिंग किंवा शॉपिंग बंदच आहे; पण जीवनावश्यक वस्तूंची महागाईच सध्या चैनीसारखी वाटत आहे. सुदैवाने शाळा, क्लासेसच्या फी यांचा खर्च सध्या तरी डोक्यावर नसल्याने दिलासा आहे.

- विजया केंगार, गृहिणी, सांगली

लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद असल्याने शिलकीच्या पैशांतून घर चालवावे लागत आहे. रेशनिंगच्या धान्यावर घर चालत नाही. धान्य भरपूर मिळते, त्यातील थोडे विकून इतर खर्च भागवितो. गॅस फक्त स्वयंपाकापुरता वापरतो, बाकी कामे सरपणाच्या शेगडीवर चालतात. तेल, किराणा यांची दरवाढ पोटभर खाऊ देईना झाली आहे.

- अशोक लोहार, कामगार, कुपवाड अैाद्योगिक वसाहत

कोट

बांधकाम साहित्याची दरवाढ असह्य आहे. पूर्वी घेतलेल्या कामांना महागाईचे कारण सांगून दरवाढ करता येत नाही. सिमेंट व सळीची दरवाढ पेलणारी नाही. लॉकडाऊनमुळे सरकारी बिलेदेखील अडकली आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायदेखील लॉकडाऊन करून ठेवण्याची वेळ आली आहे.

- महावीर पाटील, स्थापत्य अभियंता