शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्याला दाम्पत्याची मारहाण

By admin | Updated: January 14, 2016 00:04 IST

विजयनगरमधील प्रकार : पाणीपुरवठ्याचे थकीत बिल वसुलीवेळी घटना

सांगली : थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याला थकबाकीदार दाम्पत्याने मारहाण केल्याची घटना बुधवारी विजयनगर येथे घडली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मीटर रीडरलाही धक्काबुकी झाली. या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांत दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट दिले आहे. कर्मचारी, मीटर रीडरसह सर्वजण वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. बुधवारी पाणीपुरवठा विभागाकडील वॉरंट अधिकारी राजश्री अशोक चौगुले व मीटर रीडर इब्राहीम पखाली विजयनगर येथील गजानन सोसायटीमध्ये थकबाकीदारांकडे वसुलीसाठी गेले होते. सोसायटीतील गिरीजा बंगला येथे राहणाऱ्या सुप्रिया व प्रशांत सिंग या दाम्पत्याच्या दोन घरांचे अनुक्रमे १७ हजार ३०८ रुपये व ७२ हजार ५२३ रुपये पाण्याचे बिल थकित आहे. चौगुले व पखाली यांनी सिंग दाम्पत्याला पाण्याचे बिल भरण्याची विनंती केली. अन्यथा पाणी कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे सिंग दाम्पत्याने चौगुलेंना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यात पखाली यांनी मध्यस्थी करीत, चौगुले यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठ्याचे बी. एन. वाडकर यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग ठाण्यात धाव घेतली. स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक युवराज गायकवाड यांनीही चौगुले यांची विचारपूस केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंग दाम्पत्यावर रात्री गुन्हा दाखल झाला. कनेक्शन परस्पर जोडले सिंग दाम्पत्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचे बिल थकीत आहे. गजानन सोसायटीसह अन्य एका ठिकाणी त्यांचे घर आहे. या दोन्ही ठिकाणची थकबाकी ९० हजारांच्या घरात गेली आहे. यापूर्वी दोनदा त्यांचे पाणी कनेक्शन तोडले होते; पण त्यांनी परस्परच पाणी कनेक्शन जोडून घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.