शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

‘कृषी संजीवनी’ला शेतकऱ्यांचाच ठेंगा!

By admin | Updated: September 23, 2014 23:58 IST

जिल्ह्यातील स्थिती : ८३ कोटींची थकबाकी, भरले केवळ ५.२९ कोटी; शासनाच्या चुकांमुळे थकबाकीचा डोंगर

अशोक डोंबाळे - सांगली -राज्य शासन आणि महावितरणने निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांकडील थकित वीज बिल वसुलीसाठी आॅगस्टमध्ये आणलेल्या कृषी संजीवनी योजनेला थकबाकीदारांनी ठेंगा दाखवला आहे. जिल्ह्यातील एक लाख २४ हजार ३१५ ग्राहकांकडे ८३ कोटी रुपये वीज बिल थकित आहे. यापैकी १४ हजार ६९९ ग्राहकांनी केवळ पाच कोटी २९ लाख रुपये भरल्यामुळे महावितरण कंपनी आर्थिक कोंडीत सापडली आहे.दुष्काळ, अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज बिल वेळेवर भरता आले नाही. त्यातच महावितरणच्या काही चुकीच्या बिलांचाही परिणाम झाला. त्यामुळे दुष्काळात राज्य शासनाने शंभर टक्के वीज बिल सवलतीची घोषणा केली. मात्र त्यानंतर ३३ टक्केच वीज बिल सवलतीचा आदेश आला. शासनाच्या धरसोड निर्णयामुळे कृषी पंपांच्या थकबाकीचा डोंगर वाढला. यामध्ये काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक वीज बिल भरले नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने दोन महिन्यांपूर्वी कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेत थकबाकीच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतर ५० टक्के रक्कम शासन महावितरणला देणार होते. शेतकऱ्यांनी ५० टक्के थकबाकीची रक्कम भरण्यासाठी महावितरणने तीन हप्ते करून दिले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ आॅगस्टची मुदत होती. या कालावधित शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी म्हणून महावितरणने धडपड केली. जिल्ह्यातील ८३ कोटी थकबाकीपैकी शेतकऱ्यांकडून ४१ कोटी ५० लाख रुपये वसूल होणे अपेक्षित होते. ही रक्कम वसूल झाल्यानंतर ४१ कोटी ५० लाख रुपये शासन अनुदान म्हणून महावितरणला देणार होते. मात्र शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या योजनेला ठेंगा दाखवल्याचे वसुलीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. ४१ कोटी ५० लाखापैकी आतापर्यंत केवळ पाच कोटी २९ लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित ३६ कोटी २१ लाख कसे वसूल करायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना भेडसावत आहे. आता महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेतून थकबाकी भरण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, हा कालावधी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीचा असल्यामुळे मुदतवाढ दिल्याने थकबाकी वसूल होणार का, याचीही अधिकाऱ्यांना चिंता आहे.विभागनिहाय कृषी पंपांची वसुलीइस्लामपूर : १५ हजार ७९२ ग्राहक : तीन कोटी नऊ लाख थकबाकी : एक कोटी २४ लाख वसुली अपेक्षित. त्यापैकी केवळ ५९ लाख वसूलकवठेमहांकाळ : ४९ हजार २५० ग्राहक : १८ कोटी ७८ लाख थकबाकी : सात कोटी ५१ लाख वसुली अपेक्षित. त्यापैकी एक कोटी एक लाख वसूल सांगली ग्रामीण : २९ हजार २९० ग्राहक : नऊ कोटी ४२ लाख थकबाकी : तीन कोटी ७७ लाख वसुलीची गरज : एक कोटी ६५ लाख वसूलसांगली शहर : ५७३ ग्राहक : १२ लाख थकबाकी : पाच लाख वसुली होणे अपेक्षित : केवळ तीन लाख वसूल विटा : २९ हजार २४३ ग्राहक : आठ कोटी १९ लाख थकबाकी : तीन कोटी २८ लाख वसुलीची गरज : एक कोटी ३३ लाख वसूल