शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार!

By admin | Updated: July 29, 2014 23:30 IST

जतमधील स्थिती : तलाठी सजामध्ये येत नसल्याने कामे रेंगाळली

दरीबडची : महसूल विभागाचे दुर्लक्ष व संगणकीकरणाच्या नावाखाली जत तालुक्यातील तलाठी सजामध्ये येत नसल्याने सात-बारा, खाते उतारा, पीक नोंदी, वारसा हक्क, जागा, शेती खरेदीच्या नोंदीची कामे ठप्प झाली आहेत. राष्ट्रीय पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. गावात शेतकऱ्यांना सात-बारा, खाते उतारे मिळत नाहीत. जतला येऊन उतारे घेऊन जावे लागत आहेत. काही गावांमध्ये कोतवाल, तलाठ्यांचे मदतनीसच काम पहात आहेत. उतारे न मिळाल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.तालुक्यातील महसूल विभागाचे सात-बारा, खाते उताऱ्यांचे संगणकीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. प्रत्येक सजातील दफ्तर संगणकीकृत करण्यासाठी घेण्यात आले आहे. त्यामुळे तलाठी गावकामगार गावातच येत नाहीत. गावातील कारभार कोतवाल, झिरो तलाठी यांच्या सहाय्याने सुरू आहे. शेतकऱ्यांना सात-बारा, खाते उतारा मिळण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. जादा पैसे वसूल करुन शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. सात-बारा, खाते उताऱ्यावर सही आणण्यासाठी जतला जावे लागत आहे.राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजना २०१४-१५ साठी योजना चालू आहे. खरीप हंगामातील बाजरी, मूग, भुईमूग या तीन पिकांसाठी विम्याची तरतूद शासनाने केली आहे. विमा हप्ता रक्कम बाजरीसाठी २२४ रुपये, मुगासाठी ३०२ रुपये, भुईमुगासाठी ८३३ रुपये पाच हेक्टरसाठी आहे. अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. परंतु तलाठी वेळेवर येत नसल्यामुळे सात-बारा, खाते उतारा मिळत नाही. याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला असता, कोतवालाला जतला पाठवून त्यांच्यामार्फत उतारे देण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले जात आहे. पीक विम्यासाठी नोंद कशी करायची? हा यक्षप्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. मुदत संपण्यास आता केवळ दोनच दिवस राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला वेळेवर मिळत नसल्यामुळेही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तलाठ्यांना सजामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश तहसीलदारांनी द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे. प्रतिकूल वातावरणाने कायम दुष्काळी तालुक्याचा शाप लाभलेल्या जतमधील शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणेच्या दफ्तरदिरंगाईचाही शाप लाभत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. (वार्ताहर)राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१४ साठी पीक विमा योजना चालू आहे. या योजनेमध्ये तालुक्याचा समावेश असून, या योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी केले आहे.