शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

हळद आवक वाढल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांना फटका

By admin | Updated: June 23, 2014 00:51 IST

जिल्ह्यातील स्थिती : बारा महिने हंगाम; दोन लाख पोती शिल्लक राहिल्याने चिंता

अंजर अथणीकर, सांगली : गेल्या तीन वर्षांपासून हळदीचे उत्पादन वाढण्याबरोबरच शिल्लक साठ्यात वाढ झाल्याने ऐन हंगामात हळदीचा दर घसरल्याने शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. हळद साठवणुकीचाही प्रश्न आता गंभीर झाला आहे. आगामी काळात हळदीचे क्षेत्र कमी झाले, तरच शिल्लक हळदीचा प्रश्न मिटणार आहे. सांगलीची बाजारपेठ हळदीची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. २०११ मध्ये हळदीला उच्चांकी दर मिळाल्यानंतर हळदीचे गणित बिघडले आहे. २०११ मध्ये हळदीचा दर तब्बल २१ हजार रुपये क्विंटल इतका विक्रमी झाला होता. त्यानंतर हळदीच्या लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढल्याने हळदीचे गणित बिघडले. सांगलीमध्ये स्थानिक परिसरातून २५ टक्के, तर आंध्र प्रदेश व तामिळनाडूमधून सुमारे ७५ टक्के हळदीची आवक होत असते. सर्वसाधारणपणे ७ ते ८ लाख पोती (एक पोते ७० ते ८० किलो) हळदीची सांगलीच्या बाजारपेठेत आवक होत असते. हळदीच्या बाजारपेठेचा हंगाम जानेवारी ते जुलैअखेर चालतो. जानेवारी ते मे अखेर सुमारे ७ लाख पोत्यांची आवक झाली असून, जुलैअखेर आणखी २ लाख पोत्यांची आवक होण्याची शक्यता आहे. यावर्षीही सुमारे वीस टक्के हळदीची आवक वाढली आहे. सांगली परिसरातील गोदाम, कोल्ड स्टोअरेजमध्ये १ लाख ८० हजार पोती शिल्लक असून, हरिपूरच्या शंभर पेवांमध्ये सुमारे तीस हजार पोती हळद शिल्लक आहे. शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही आता गोदाम व कोल्ड स्टोअरेजचे भाडे परवडणारे नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदाम व पेवांमधील हळदीलाही आता डंख लागत आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी यांची हळद विक्रीसाठी धडपड सुरू आहे. सांगलीच्या हळदीची संपूर्ण देशाबरोबरच परदेशातही निर्यात होते.सध्या हळदीचा दर ४ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपये क्विंटल आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या ऐन हंगामात हळदीचा दर दीड हजार ते दोन हजार रुपयांनी उतरला आहे. गतवर्षी जूनमध्ये हळदीचा दर सहा हजार ते ९ हजार रुपये क्विंटल होता. यावर्षी दर उतरला असून, आगामी मान्सूममध्ये हळदीची लागवड कमी झाली तरच हळदीचे दर स्थिरावण्याची शक्यता आहे.