शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रेल्वेमार्गासाठी रेल्वे अर्थसंकल्पात निधीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

लाेकमत न्युज नेटवर्क मिरज : रेल्वे अर्थसंकल्पात या वर्षी पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासोबत कऱ्हाड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी या ...

लाेकमत न्युज नेटवर्क

मिरज : रेल्वे अर्थसंकल्पात या वर्षी पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासोबत कऱ्हाड-चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गासाठी भरीव तरतुदीची प्रवाशांची अपेक्षा आहे.

मिरज-पुणे दुहेरीकरणाचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू आहे. प्रस्तावित लोणंद-बारामती, कऱ्हाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांचे सर्वेक्षण व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन काम सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. कोल्हापूर-वैभववाडी, कऱ्हाड-चिपळूण या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम सुरू होण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद होणे आवश्यक आहे. कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गाची चाचणीही झाली आहे. मिरज-पंढरपूर मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने रेल्वेगाड्यांची गती वाढणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे गेल्या नऊ महिन्यांत मिरज व कोल्हापुरातून धावणाऱ्या पॅसेंजर व एक्स्प्रेस अद्याप बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य शासनाने पॅसेंजर सुरू करण्यास परवानगी देण्याची प्रवाशांची मागणी आहे. मिरज व कोल्हापूर स्थानकांतून कोल्हापूर-धनबाद व कोल्हापूर-अहमदाबाद या दोन एक्स्प्रेस वगळता गेल्या १० वर्षांत एकही नवीन लांब पल्ल्याची रेल्वेगाडी सुरू झालेली नाही. मिरज-पंढरपूर मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय कमी आहे. या मार्गावरील कोल्हापूर-हैदराबाद रेल्वे बंद करण्यात आली आहे. सोलापूरला जाण्यासाठी सध्या एकही एक्स्प्रेस उपलब्ध नाही. विद्युतीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावर रेल्वेगाड्या वाढविण्याची मागणी आहे.

कोल्हापूर-वैभववाडी, कऱ्हाड-चिपळूणसह सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नवीन रेल्वेमार्गाची कामे निधीअभावी सुरू झालेली नाहीत. कोल्हापूर मॉडेल रेल्वेस्थानके बनविण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात पाच वर्षांपूर्वी घोषणा झाली. मात्र त्यासाठी निधीची तरतूद होत नसल्याने हे काम रखडले आहे. कोल्हापूर व मिरज या ‘अ’ दर्जाच्या रेल्वेस्थानकात वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर, सरकता जिना अशा सुविधांची प्रतीक्षा आहे. या वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेच्या पुणे विभागातील कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेऊन प्रवासी सुविधांसाठी निधीच्या तरतुदीची मागणी आहे.

सांगली, मिरज स्थानकांत पिटलाईनची व्यवस्था झाल्यास लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस मिरजेतून सुरू करता येणार आहेत. मिरज, सांगली, सातारा, कोल्हापूर रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करून प्रवासी सुविधा, पॅसेंजर गाड्यांचे डबे वाढवावेत. मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाचे रखडलेले काम सुरू करण्याची व रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

दुहेरीकरणाची संथगती

मिरज-पुणे या २८० किलोमीटर रेल्वेमार्गांच्या दुहेरीकरणाच्या गेल्या तीन दशकांच्या मागणीस रेल्वेने मंजुरी दिल्यानंतर २०१७ मध्ये दुहेरी करणाच्या कामास प्रारंभ झाला. मात्र गेल्या चार वर्षांत पुण्याजवळ काही किलोमीटर व ताकारी ते शेणोली ४५ किलोमीटर दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी मार्गाच्या मातीच्या भराव व पुलांचे काम अद्याप सुरु आहे. काम संथगतीने सुरू असल्याने या वर्षी जुलै २०२१ पर्यंत निर्धारित वेळेत दुहेरीकरण पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिरज-पुणेसोबत सुरू झालेल्या दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या मिरज -लोंढा दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. मिरज-पुणे दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेगाड्यांची संख्या व गती वाढणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. मात्र काम वेळेत पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.