शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात साडेचार फूट मगर सापडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

आष्टा : आष्टा येथील बसुगडे मळा परिसरात साडेचार फूट मगर आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बसुगडे मळा ...

आष्टा : आष्टा येथील बसुगडे मळा परिसरात साडेचार फूट मगर आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बसुगडे मळा परिसरात पहिल्यांदाच मगर दिसल्याने खळबळ उडाली हाेती.

आष्टा येथील बसुगडे मळा गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या मळ्याच्या पूर्व बाजूने ओढा वाहताे. या ओढ्यानजीकच्या शेतात शिरीष सावंत यांना मगर आढळली. त्यांनी तातडीने पालिकेचे कर्मचारी सचिन मोरे यांना माहिती दिली. तातडीने ते कुमार शिंदे, फरदीन आत्तार, पोपट शिंदे यांच्यासह पालिकेची अग्निशमन गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

नगरसेवक जगन्नाथ बसुगडे यांच्यासह बसुगडे मळा परिसरातील युवकांनी घटनास्थळी गर्दी केली. या मगरीला पकडण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. मुख्याधिकारी डॉ.कैलास चव्हाण यांच्यासह वनपाल चरापले व साठे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. सचिन मोरे, विकास मोरे, युवराज वाघमारे, दिनेश सावंत, अरविंद वाघमारे, अक्षय सावंत यांनी मगरीला पकडले. या परिसरात पहिल्यांदाच मगर सापडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या वतीने मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

फोटो : १८ आष्टा १

ओळ : आष्टा येथील बसुगडे मळ्यात साडेचार फूट मगर सापडली. विकास मोरे, सचिन मोरे, युवराज वाघमारे, दिनेश सावंत, अरविंद वाघमारे, अक्षय वाघमारे यांनी तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.