शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार अखेर खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST

आटपाडी : तालुक्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे विविध संघटना वारंवार आंदोलने करीत होत्या. आटपाडी पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून २०१३ पासून ...

आटपाडी : तालुक्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे विविध संघटना वारंवार आंदोलने करीत होत्या. आटपाडी पोलिसांनी दक्षतेचा उपाय म्हणून २०१३ पासून प्रवेशद्वारच कायमस्वरूपी बंद केले होते. आता तब्बल सात वर्षांनी हे प्रवेशद्वार उघडण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांची ठाण्यात इतर प्रवेशद्वारांतून चोरासारखे जाण्याची नामुष्की टळली आहे.

शासकीय इमारत होण्यापूर्वी पोलीस ठाण्याच्या शेजारी तहसील कार्यालय होते. त्यामुळे तहसील कार्यालयावर मोर्चे काढले जायचे. टेंभू योजनेसाठी खूप आंदोलने झाली. चारा छावण्यांसाठी जनावरे आवारात सोडण्यात आली. मेंढ्या घुसविण्यापासून कुलपे ठोकण्यापर्यंत आंदोलने झाली. मग पोलिसांनी आंदोलकांना बाहेरच रोखण्यासाठी प्रवेशद्वारच बंद केले होते.

आता नव्याने तहसील कार्यालय झाले. त्यांच्या प्रवेशद्वारातून पोलीस येऊ लागले; पण वाळूतस्करी करताना पकडलेली वाहने पुन्हा चोरून नेऊ नयेत यासाठी ते प्रवेशद्वाराला कुलूप लावू लागले. त्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली. त्यासाठी त्यांनी प्रवेशद्वार उघडले. चांगली स्वच्छताही केली आहे. अंगणात फरशी टाकण्याचे नियोजन आहे.

कोट

चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी लवकरच एका अधिकाऱ्यासह विशेष पथकाची नेमणूक करणार आहे. हे पथक फक्त घरफोड्यांचाच तपास करील.

- अरुण देवकर पोलीस निरीक्षक, आटपाडी

चौकटीत

खोटे गुन्हे कधी थांबणार?

आटपाडी पोलीस ठाणे खोट्या गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध आहे. परस्परविरोधी फिर्याद देताना ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अगदी विनयभंगाचेही खोटे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे पोलिसांची विश्वासार्हता कमी होऊ लागली आहे. हे पोलिसांच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने धोक्याचे आहे.

चौकट

गुन्हे वाढले, पोलीस घटले!

आटपाडी तालुक्यात गुन्ह्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २०१९ मध्ये २८७, तर २०२० मध्ये ३१९ दखलपात्र गुन्हे दाखल झाले. २०१९ मध्ये १३ विनयभंग व २०२० मध्ये ४० गुन्हे दाखल आहेत. गुन्हे वाढत असताना पोलिसांची संख्या मात्र कमी केली जात आहे. १ लाख ३५ हजार लोकसंख्येच्या आणि ६० गावांच्या या तालुक्यात केवळ ४० पोलीस आहेत. इथे किमान १०० पोलिसांची गरज आहे.

फोटो-११आटपाडी१