शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

हरिपूरच्या पेवांचे पोट रिकामे

By admin | Updated: January 17, 2017 00:15 IST

‘कुलूप नसलेली गोदामे’ संकटात : नैसर्गिक रखवालदारी संपुष्टात

शीतल पाटील ल्ल सांगली‘टर्मरिक सिटी’ म्हणून सांगलीची ओळख देशात आहे. हा मान मिळवून देणाऱ्या हळदीच्या रखवालीची जबाबदारी हरिपूरच्या पेवांनी अखंडित सांभाळली. मात्र २००५ च्या महापुरात हजारो पेवे नष्ट झाली. तरीही आज तेवढ्याच प्रमाणात ती शिल्लक आहेत. कुलूप नसलेल्या या गोदामांवर कधीकाळी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत होते. आता मात्र ही पेवे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सांगलीपासून तीन किलोमीटर अंतरावरील हरिपूर हे गाव नावारूपाला आले, ते हळदीच्या पेवांमुळे. चार ते पाच लाख क्विंटल हळकुंडे साठवणुकीची क्षमता असलेली अडीच हजारावर पेवे होती. २६ जुलै ते ६ आॅगस्ट २00५ या कालावधित कृष्णा नदीला आलेल्या महापुराने या ऐतिहासिक पेवांना जलसमाधी दिली. अडीच हजारपैकी हजार पेवे वाचली. मात्र गेल्या दहा वर्षात पेवांचे महत्त्व कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेव बंद करून शेतीकडे मोर्चा वळविला आहे. आजही हरिपुरात ३०० ते ४०० पेव आहेत. पण पूर्वीसारखा त्यांचा हळद साठवणुकीसाठी वापर कमी झाला आहे. सध्या १०० ते १२५ पेवांमध्येच हळद साठविली गेली आहे. कुलूप नसलेल्या या गोदामांवर बँकाही विश्वास ठेवून होत्या. या पेवांवर थेट व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा केला जात होता. पण महापुरानंतर ही स्थिती थोडी बदलली. व्यापाऱ्यांनीही पेवांपेक्षा गोदामांना पसंती दिली.पेव म्हणजे काय?हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते. थोडासा जरी ओलसरपणा लागला तर ती काळपट लाल होते. त्यामुळे पावसाळ्यात हळद साठविण्यासाठी जमिनीमध्येच घागरीच्या आकाराची कोठारे खणण्यात आली. त्यांनाच पेव म्हटले जाते. हरिपूरची पेवे त्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील माती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाळासारख्या घट्ट असलेल्या या मातीमुळे पेवात पाणी अथवा हवेचा शिरकाव होत नाही. प्राणवायुअभावी तेथे हळदीला कीड लागू शकत नाही. शिवाय हळदीचे वजन वाढून त्याचा रंगही खुलतो. परिणामी चांगल्या प्रतीची हळद चार ते पाच वर्षे टिकून राहते.