शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

कसबे डिग्रज पाणी योजनेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2015 00:40 IST

जॅकवेल-इनटेक वेलचा संपर्क तुटला : वाळू, माती उपशाचा परिणाम

सोमनाथ डवरी - कसबेडिग्रज -कृष्णा नदीवर ब्रम्हनाळ डोह येथून कसबे डिग्रज आणि तुंग बागणी पाणी पुरवठा योजना गेली कित्येक वर्षे कार्यरत आहे. पण सततच्या वाळू उपशामुळे इनटेक वेल आणि जॅकवेलजवळील नदीकाठ खचल्याने या दोन्हीमधला संपर्क तुटला आहे. त्यामुळे संपूर्ण योजनेचा बोजवारा उडाला आहे. तात्पुरती उपाययोजना करून पाणी पुरवठा सुरूआहे. मात्र वेळेवर उपाययोजना न केल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.कृष्णा नदीतून गेली कित्येक वर्षे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला आहे. ब्रम्हनाळ डोह ते डिग्रज बंधाऱ्यापर्यंत शेती आणि नळपाणी पुरवठ्याची जॅकवेल आणि इनटेक वेल यांची मोठी संख्या आहे. पण वाळू उपसा आणि वीट भट्टीसाठी माती उपशामुळे या योजना धोक्यात आल्या आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही वाळू वीटसम्राट आणि स्वार्थी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे संपूर्ण नदीकाठ योजना धोक्यात आल्या आहेत. पण सध्या याबाबत कोणीही बोलत नाही.नदीकाठच्या गावात बदलीसाठी तलाठी, महसूल खाते ‘अर्थपूर्ण’ फिल्डिंग लावत आहे. पण आमदार-खासदार आपापल्या बगलबच्च्यांना मोठे करण्यासाठी वाळू ठेके देत होते. सध्या गावोगावच्या पुढारी, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांमध्ये वाळू ठेकेदारांचा मोठा सहयोग दिसत आहे. अनेक कोतवाल, तलाठी, मंडल अधिकारीही ‘गब्बर’ झाले आहेत.कसबे डिग्रजमध्ये ग्रामपंचायतीने थेट नदीतून मोटारीद्वारे तात्पुरती यंत्रणा राबवून पाणी पुरवठा सुरू केल्या आहेत. पण पावसाळ्यात नदी पात्रात पाणी वाढले तर ही यंत्रणा टिकणार नाही, असे चित्र आहे.नव्याने जॅकवेल-इनटेक वेल उभारणे सोपी, खर्च न परवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.जॅकवेलला धोका...कसबे डिग्रजमध्ये पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्याने ग्ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. सध्या पाणी पुरवठा करणारी जॅकवेल आणि इनटेक वेल ‘ढासळण्याच्या’ स्थितीत आहे. अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे. तुंगमध्ये शेती पाणी योजनेतून काही दिवस पाणी दिले जात आहे. वेळेवर उपाययोजना न केल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.