शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात निवडणुकीवर बहिष्कारच

By admin | Updated: October 26, 2016 00:13 IST

एकही अर्ज विक्री, दाखल नाही : नगरपंचायतीसाठी मतदार मदत केंद्र सुरू

शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी शिराळकरांच्या निवडणुकीवरील बहिष्कारामुळे दुसऱ्या दिवशीही एकाही अर्जाची विक्री झाली नाही अथवा एकही अर्ज दाखल झाला नाही. मंगळवारी निवडणूक प्रशासनाने आॅनलाईन अर्ज भरण्यातील अडचणी दूर करण्यासाठी मतदार मदत केंद्र चालू केले आहे.शिराळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व होते. तसेच अनेक इच्छुक, आपण पहिले नगरसेवक, नगराध्यक्ष व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र गावाचा नागपंचमीचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने सर्व पक्ष तसेच इच्छुकांनी, नागरिकांनी, पहिले काम जिवंत नागपूजा करण्यासाठी परवानगी, नंतर निवडणूक, असा पवित्रा घेतला. गावाचे नाव जगाच्या नकाशात ठळकपणे नागपंचमीच्या रूपाने व्हावे, यासाठी गावकऱ्यांनी नागपंचमी बचाव कृती समिती स्थापन केली. यामध्ये पहिल्यांदा जोपर्यंत जिवंत नागपूजेस परवानगी मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही, असा पवित्रा घेतला.सोमवार हा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. त्यामुळे अनेकजण, काही होणार का? याकडे लक्ष देऊन होते. मात्र तहसील कार्यालयाकडे एकही इच्छुक नागरिक उमेदवार फिरकला नाही. त्यामुळे एकाही अर्जाची विक्री झाली नाही, त्यामुळे एकही अर्ज दाखल झाला नाही. बचाव समितीचे सदस्य अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे शनिवार दि. २९ आॅक्टोबरपर्यंत याठिकाणी आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारीही कोणीही इच्छुक या कार्यकर्त्यांकडे फिरकला नाही. मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी एस. डी. भोसले, सहाय्यक निवडणूक अधिकारी ए. के. भोसले, संजय इंगवले, प्रकाश शिंदे, सुभाष इंगवले आदी तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित होते. (वार्ताहर)गावकऱ्यांची भूमिका समितीकडून सादर बचाव समितीमार्फत काळजी म्हणून या समितीचे रणजितसिंह नाईक, विश्वास कदम, गजानन सोनटक्के, देवेंद्र पाटील, के. वाय. मुल्ला, लालासाहेब शिंदे, पप्पू यादव, बसवेश्वर शेटे, संतोष गायकवाड, वैभव कुंभार, वसंत कांबळे, शंकरराव कदम, विनायक गायकवाड, अजय जाधव, वासीम मुल्ला, अशोकराव गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य याठिकाणी उपस्थित होते. कोणी अर्ज भरण्यास आलाच, तर त्यास गावकऱ्यांची भूमिका सांगण्यासाठी हे सदस्य उपस्थित होते.