शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार एकरातील पिके धोक्यात

By admin | Updated: January 29, 2015 00:11 IST

राजेवाडी तलावात अपुरा पाणीसाठा : सिंचन सुविधांची वानवा; पिके करपण्याची भीती

लक्ष्मण खटके - लिंगीवरे -राजेवाडी तलावात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नसल्यामुळे त्यावर आधारित असणाऱ्या सुमारे आठ हजार एकर पिकाला धोका निर्माण झाला असून, पाण्याच्या ऐन गरजेच्या हंगामात पिके पाण्यावाचून करपण्याची भीती निर्माण झाली आहे. -राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर आधारित ४४२०८ एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ पूर्वी मिळत होता. तलावाच्या डाव्या कालव्याद्वारे आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, लिंगीवरे, उंबरगाव, पुजारवाडी, दिघंची, सांगोला तालुक्यातील खवासपूर, कटफळ, महूद, अचकदाणी, लक्ष्मीनगर आणि पूर्वेकडील काही भाग असे सिंचनाचे लाभक्षेत्र आहे. याशिवाय माण तालुक्यातील पळसवडे, देवापूर, हिंगणी, ढोकमोड या गावांनाही तलावातील पाण्याचा थेट लाभ मिळतो. तलावात पाणीसाठा असतानाच या क्षेत्राला त्याचा लाभ होतो. तलावाच्या डाव्या कालव्यातून सोलापूर जिल्ह्यातील शेरेवाडी तलावात पाणी सोडण्यात येते. पण पावसाच्या कमतरतेमुळे सध्या तलावात पाणीसाठा खूप कमी आहे. पाणी पातळी पाच दारांच्या जवळपास आली आहे. राखीव पाणीसाठ्याचा प्रश्न उभा आहे. शिवाय माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तलावातील पाणीसाठा तुटपुंजा वाटत आहे. राजेवाडी तलाव पाण्याने भरून घेण्याबाबत राजकीय उदासीनता असतानाच प्रशासनालाही या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न जनतेच्या काळजातच फक्त जळताना दिसत आहे. तलावात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नसल्यामुळे आता डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी संपूर्ण पिके हाता-तोंडाला येत असतानाच पाण्यावाचून करपण्याची चिन्हे व भीती निर्माण झाली आहे. पोटऱ्यातील ज्वारी पीक भरणीतील मका, गहू, हरभरा, ऊस उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वतंत्र सिंचन योजनेद्वारे विहिरी, कूपनलिका, आड यामार्फत पाणीपुरवठा करून पिके भिजविण्याची तयारी न केल्यास या पिकांची राख होण्यास वेळ लागणार नाही. गाळ साठल्याने पाणीसाठा कमीतलावात गेल्या शतकापासून गाळ मोठ्या प्रमाणात साचू लागल्यामुळे व त्याचा पुरेसा उपसा न झाल्यामुळे तलावाचा पाणीसाठा १४९३ दशलक्ष घनफूटपेक्षाही कमी झाला. त्यामुळे तलावाचे सिंचन लाभक्षेत्र ४४२०८ एकरावरुन केवळ ८ ते १० हजार एकरापर्यंत कमी झाले आहे. सध्या तलावात पाणीसाठा खूप कमी आहे. पाणीपातळी पाच दारांच्या जवळपास आली आहे. राखीव पाणीसाठ्याचा प्रश्न निंर्माण झाला आहे. शिवाय माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत मागणी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करता तलावातील पाणीसाठा तुटपुंजा आहे. राजेवाडी तलाव पाण्याने भरून घेण्याबाबत राजकीय उदासीनता असतानाच, प्रशासनालाही या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. तलावाच्या पाण्याच्या भरंवशावर केलेली पिके आता कधी करपतील सांगता येत नाही. शासनाने तलाव भरून घेण्यासाठी व माणगंगा नदीत पाणी सोडून बारमाही करण्यासाठी प्रयत्न केले, तरच शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करता येईल.- चंद्रकांत मदने, शेतकरी, राजेवाडी