शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात रस्त्यावर फिरणाऱ्यांत सापडले आठ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरामध्ये कोणतेही काम नसताना फिरणाऱ्या रिकामटेकड्यांकडून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे वास्तव दुसऱ्यादिवशीही समोर आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरामध्ये कोणतेही काम नसताना फिरणाऱ्या रिकामटेकड्यांकडून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे वास्तव दुसऱ्यादिवशीही समोर आले. विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतल्यावर सोमवारी ९७ जणांमध्ये तिघे, तर मंगळवारी ८७ व्यक्तींच्या तपासणीत शिराळा नाका परिसरात आठ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.

शहरामध्ये वाळवा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची रॅपिड अ‍ॅंटिजेन टेस्ट करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यास सोमवारपासून सुरुवात केली.

मंगळवारी सकाळी शिराळा नाका परिसरात आरोग्य विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची अ‍ॅंटिजेन तपासणी करण्याची मोहीम राबविली. त्यामध्ये रेठरेधरण आणि शिवपुरी या गावांतून आलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे या चाचणीतून समोर आले. या आठजणांत सांगली येथील एकाचा समावेश आहे. या सर्वांची रवानगी कामेरी रस्त्यावरील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी दिली.