शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक संस्थांची दुकानदारी मोडणार

By admin | Updated: May 20, 2016 00:06 IST

शिवाजीराव नाईक : इस्लामपूर येथे शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचा मेळावा उत्साहात

इस्लामपूर : शैक्षणिक संस्था व शाळांनी स्वत:च दुकानदारी चालू केल्याने शैक्षणिक साहित्य विक्रेते व व्यापाऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. संस्थांनी ज्ञानदानाचा आपला मूळ हेतू बाजूला ठेवून व्यापार चालविला आहे. याबाबत शिक्षणमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांकडून संबंधित शैक्षणिक संस्थांवर नियमानुसार कारवाई करायला भाग पाडू, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले. येथे राज्यातील शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी नाईक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाजपचे प्रदेश सचिव संजय उपाध्याय अध्यक्षस्थानी होते. शिक्षक नेते, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख श्रीनिवास नागे, संघटनेचे राज्याध्यक्ष नाना कांबळे, राज्य संघटक मोहन पाटील, उपाध्यक्ष विनायक मोहिते, लक्ष्मीकांत मिनीयार, सुनील वायचळ यांची प्रमुख उपस्थिती होती. भगवानराव साळुंखे म्हणाले, संघटनेच्या मागण्या योग्य असून याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. खासगी शिकवणी वर्ग, शिक्षण संस्था यांनी बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य विक्रीचे काम थांबविले नाही, तर आमची ताकद या संघटनेच्या पाठीशी उभी करु.संजय उपाध्याय म्हणाले, शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनच्या मागण्यांचा जो लढा उभा केला आहे, त्याचा सरकारदरबारी पाठपुरावा करु. आ. जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉलद्वारे मेळाव्यास शुभेच्छा देऊन, संघटनेच्या न्याय्य मागण्यांबाबत विरोधी पक्ष गटनेता या नात्याने सरकारदरबारी पाठपुरावा करु, असे स्पष्ट केले. प्रा. शामराव पाटील, सर्जेराव यादव यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात विद्यार्थ्यांना गणवेश व अन्य शैक्षणिक साहित्य शाळांमधून विक्री करु नये, हे साहित्य ठराविक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करु नये, गणवेश अथवा साहित्यामध्ये बदल करावयाचा असल्यास एक वर्ष अगोदर सूचना देणे बंधनकारक करावे, व्यापारी संघटनेशी राजकीय पक्षाने चर्चा केल्याशिवाय बंद पुकारु नये, यांसह इतर ठराव करण्यात आले.सकाळी शहरातून पुस्तक व ग्रंथदिंडी काढण्यात आली. व्ही. बी. स्वामी यांनी स्वागत केले. नाना कांबळे यांनी संघटनेची माहिती दिली. मेळाव्यात व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना नरेंद्र नंदू, जुगलभाई देदीया, मणीभाई गाला, अमृतभाई शहा, सदानंद कोरगावकर यांनी उत्तरे दिली. विनायक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष उमेश कुरळपकर यांनी आभार मानले. मोहन पाटील, अभय शहा, गौरव शहा, मनोज जैन, नाथाजी अवघडे, अभिजित पाटील, अशोकराव पाटील, रेखा भोसले यांनी मेळावा यशस्वितेसाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)न्यायालयात धाव राज्य संघटक मोहन पाटील (इस्लामपूर) म्हणाले की, ज्या शाळा, संस्था बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य विक्री करतील, त्यांच्याविरुध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. शाळांमधील या दुकानदारीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे शासनानेही या कर चुकवेगिरीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.