शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या सुपुत्राने बनविले शैक्षणिक अ‍ॅप

By admin | Updated: June 12, 2016 01:05 IST

दुर्गम भागातही कार्य : संगणकाशी नाते

युनूस शेख ल्ल इस्लामपूर संस्कारक्षम अशा एका श्रेष्ठ बालकाची निर्मिती करणे म्हणजे शंभर शाळांची निर्मिती करण्यापेक्षा अधिक महान कार्य आहे, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगून ठेवले आहे. हीच उक्ती कृतीमध्ये उतरवत इस्लामपूरचे सुपुत्र सागर मधुकर पतंगे या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने तब्बल आठ शैक्षणिक मोबाईल अ‍ॅप निर्माण करून, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेकविध संकल्पनांच्या पंखांचे बळ दिले आहे. सागर पतंगे हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तामिणे या, मोबाईलची रेंज नसलेल्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या सहा वर्षांपासून ज्ञानदान करीत आहेत. अशा दुर्गम भागात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यासंबंधीच्या संकल्पना नेहमीच त्यांच्या डोक्यात रुंजी घालत होत्या. या संकल्पनांना संगणक शास्त्रातील रौप्यपदक विजेते असलेले त्यांचे बंधू संतोष पतंगे यांच्या सॉफ्टवेअर विषयातील ज्ञानाची जोड मिळाली आणि या दोघा भावांच्या परिश्रमातून आठ शैक्षणिक मोबाईल अ‍ॅपची निर्मिती झाली. राज्याचे शिक्षण सचिव के. नंदकुमार नेहमीच तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाच्या प्रसारासाठी आग्रही असतात. त्यांचीच प्रेरणा घेऊन पतंगे यांनी ही अ‍ॅप्लिकेशन्स बनवली. परिपाठ, शिक्षक डायरी, शालेय वेळापत्रक, शालेय पोषण आहाराचा हिशेब करणारे अ‍ॅप, विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या जगप्रसिध्द व्यक्तींची माहिती देणारे ‘किमयागार’ हे अ‍ॅप, तसेच आठवणीतील कविता, मराठी सुविचार, इंग्रजी कविता अशी इतरही अ‍ॅप विकसित केली आहेत. ही अ‍ॅप्लिकेशन्स तयार करताना ती इंटरनेटशिवाय चालावीत, तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना सोयीस्कररित्या वापरता यावीत, या गोष्टींकडे त्यांनी कटाक्ष ठेवला आहे. ही सर्व अ‍ॅप्लिकेशन्स कोणतेही आॅनलाईन टूल न वापरता गुगलचे कडक नियम व अटी पाळून व्यावसायिक पध्दतीने तयार केली आहेत. त्यामुळे ही सर्व अ‍ॅप्लिकेशन्स गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येतात. शिक्षक व पालकांत ही अ‍ॅप्लिकेशन्स आवडीची झाली आहेत.