शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात काँग्रेसचे मोसमी वारे

By admin | Updated: June 27, 2016 00:36 IST

निवडणुकीपुरतीच नेत्यांना येते जाग : स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव

अशोक पाटील --इस्लामपूर --वाळवा, शिराळ्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची अवस्था मोसमी वाऱ्यासारखी झाली आहे. शिराळ्यात काँग्रेसचा गड अबाधित ठेवण्यात देशमुख पिता—पुत्र सक्रिय आहेत. याउलट वाळवा तालुक्यातील नेते फक्त निवडणुकीपुरते एकत्र येऊन निवडणुकीची हाक देतात. या हाकेला माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, आनंदराव माने यांच्यासह सत्यजित देशमुख यांनी साद दिली आहे. शिराळा तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसची ताकद टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. शिराळ्यातील स्थानिक राजकारणात त्यांची ताकद निर्णायक असली तरी ती पक्षाला पुरेसे यश मिळवून देऊ शकत नाही. यामुळे देशमुख यांनी राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्याशी मिळतेजुळते घेतले आहे. परंतु पक्षआदेशामुळे जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत या दोघांना स्वतंत्ररित्या निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. याचा फायदा अनेक पक्ष फिरलेल्या शिवाजीराव नाईक यांना झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख एकत्र येणार का? असा प्रश्न आहे. कारण माजी मंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची भाषा सुरू केली आहे.शिराळ्यापेक्षा वाळव्यातील काँग्रेसची स्थिती अत्यंत बिकट आहे. सर्व नेत्यांचे चेहरे फक्त पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या बेडकांप्रमाणे निवडणुकीपुरतेच दिसतात. वाळवा तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि सत्यजित देशमुख यांना इस्लामपूर येथील सभेसाठी आमंत्रित केले होते. त्यांनीही आवर्जून आपली उपस्थिती दाखवून जयंत पाटील यांना टार्गेट करीत, झोपलेल्या काँग्रेस नेत्यांना कानमंत्र दिला आहे. आता यातून ते किती रिचार्ज होणार यावर पुढील गणित अवलंबून आहे. या नेत्यांच्या भाषणबाजीतून जयंत पाटील यांना मोठे आव्हान निर्माण करण्याचा सूर निघाला असला, तरी स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने हे कितपत शक्य होते, हे येणारा काळच ठरवणार आहे. नेते कार्यक्रमापुरतेच : पदाधिकारी नामधारीवाळवा तालुक्यात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, सी. बी. पाटील, जयराज पाटील, वैभव पवार, विजय पवार या नावांनंतर काँग्रेस थांबते. उर्वरित पदाधिकाऱ्यांची नावे सामान्यांना माहिती नाहीत. कालच्या मेळाव्यास उपस्थित असलेले अ‍ॅड. एच. के. पाटील, जयकर कदम, प्रवक्ते संतोष पाटील, जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील, प्रा. हेमंत कुरळे, शिवाजीराव निळकंठ, आनंदराव पाटील, प्रतापराव मोरे, धनंजय कुलकर्णी, किरण चव्हाण हे काँग्रेसच्या पटावर कधीच दिसत नाहीत. गेल्या काही वर्षात त्यांच्याकडून पक्षासाठी उल्लेखनीय कार्य झाल्याचे निदर्शनास येत नाही. एखाद्या मेळाव्याला अथवा कार्यक्रमालाच त्यांची उपस्थिती दिसते.