शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही जतसाठी ८० टँकर

By admin | Updated: June 13, 2016 00:10 IST

अत्यल्प पाऊस : तालुक्यातील ५६६ गावांना पाणी पुरवठा

जयवंत आदाटे -- जत तालुक्यातील सत्तर गावे आणि त्याखालील ५६६ वाड्या-वस्त्यांवर ८० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६५ मि.मी. इतके आहे. आजअखेरपर्यंत तालुक्यात फक्त १८ टक्के पावसाची नोंद येथे झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.बिळूर, जत, शेगाव परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे, तर डफळापूर व संख परिसरात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. माडग्याळ आणि उमदी परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. गतवर्षी तालुक्यात फक्त ५७ टक्के पाऊस झाला होता. कडक ऊन व अत्यल्प पाऊस यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. मागील आठ-दहा दिवसात जत तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे. सर्वच ओढे-नाले, साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. त्यामुळे काही भागात समाधानकारक पाऊस पडूनही चारा व पाणी टंचाईची तीव्रता कमी झालेली नाही. तालुक्यातील चारा व पाणीटंचाई कमी होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. परंतु डोण भागातील काळ्या जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही. जमिनीत फक्त पाच ते सहा इंच खोल ओलावा निर्माण झाला आहे. जत, शेगाव, डफळापूर, बनाळी, बिळूर, उमराणी परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरण्या केल्या आहेत. मागील तीन-चार दिवसात अजिबात पाऊस झाला नाही. सकाळ-सायंकाळ हवेत गारवा निर्माण होत आहे. शनिवारी सकाळी काही प्रमाणात धुके पडले होते. दिवसभर ऊन पडत आहे. हवेत उकाडा जाणवत आहे. त्यामुळे खरीप हंगाम पेरणी केलेले शेतकरी हवालदिल होऊ लागले आहेत.मे महिन्यात जत तालुक्यात ८९ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. राज्यात सर्वाधिक टँकर जत तालुक्यात सुरु आहेत, असे प्रशासकीय अधिकारी खासगीत बोलताना सांगत होते. जून महिन्याच्या सुरुवातीस काही प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे प्रशासनाने बनाळी, बिळूर व जत परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नऊ टँकर बंद केले आहेत.3असा राबविला उपक्रम...जत तालुक्याची लोकसंख्या तीन लाख २४ हजार इतकी आहे. त्यापैकी एक लाख ९८ हजार ९२८ नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तालुक्याच्या पश्चिम, दक्षिण, उत्तर भागात पाणी व चारा टंचाईची तीव्रता कमी प्रमाणात असली तरी, पूर्व भागात भयानक पाणी आणि चाराटंचाई जाणवत आहे. प्रशासनाने त्यावर उपाययोजना करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.