शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियमनमुक्तीमुळे बाजार समितींना बाधा नाही

By admin | Updated: July 11, 2016 01:00 IST

सदाभाऊ खोत : व्यापाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही

सांगली : देशभरात सर्वच क्षेत्रांत खुली बाजारपेठ व्यवस्था स्वीकारली जात असताना, शेतकऱ्यांसाठी अशी व्यवस्था का असू नये, या विचारातूनच नियमनमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने बाजार समित्यांना बाधा पोहोचणार नाही. त्यामुळे बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. अशा आंदोलनाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. खोत पुढे म्हणाले की, देशातील सर्वच उद्योग क्षेत्रांत खुली बाजार व्यवस्था अस्तित्वात येत आहे. त्याचप्रमाणे बाजार समितीच्या बेड्यांमध्ये शेतकऱ्यांनाही आपल्या शेतीमालासाठी खुली व्यवस्था असावी, या हेतूने नियमनमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जुनाच असून, २००७ ला यावर चर्चा झाल्यानंतर देशातील २५ राज्यांनी तो स्वीकारला आहे. शेतकऱ्यांना जर जादा नफा मिळणार असेल, तर या धोरणाला कोणीच विरोध करायला नको. यावर विचार करण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. यात माझ्यासह बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी, हमाल व मापाडी प्रतिनिधींचा समावेश असल्याने हा निर्णय एकतर्फी घेतलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या आंदोलनावर ते म्हणाले की, व्यापारी व शेतकऱ्यांचे संबंध जुने असल्यामुळे आपसुकपणे बहुतांश माल हा शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडेच येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत व्यापाऱ्यांनी भीती व्यक्त केली असल्याने व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीचे मी स्वागत करतो. शेतकरी व व्यापाऱ्यांचे यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री असून, व्यापाऱ्यांना बाहेर माल घेता येणार आहे. तसेच बाहेर न विक्री झालेला शेतीमाल बाजार समितीतच येणार असल्याने ही भीती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. चार टक्के ‘एफआरपी’चा प्रश्न सोडवू... राज्यात आजपर्यंत ९६ टक्के ‘एफआरपी’प्रमाणे रक्कम दिली गेली आहे. हे देशात आणि राज्यात सरकार बदलल्याचा चांगला परिणाम आहे. कारखान्यांच्या अडचणींमुळे चार टक्के ‘एफआरपी’ राहिली असली तरी केंद्राकडून येणारे टनाला ४५ रुपयांचे अनुदान आले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. हा प्रश्न सोडविणे आवाक्याबाहेरचे वाटत नसून, सर्वांना विचारात घेऊन या प्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी ‘नाही रे’ वर्गाचाच प्रतिनिधी शेतकरी संघटनेचा महायुतीतील सहभाग हा बळिराजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच झाला आहे. ज्या चळवळीच्या जोरावर हे पद मिळाले, त्याला कधीही विसरणार नसून, सर्वसामान्य मातीतील ‘नाही रे’वर्गाचा प्रतिनिधी म्हणूनच मी काम करत राहणार आहे. माझ्या पदाचा उपयोग या सर्वसामान्य जनतेच्या जीवनात चार दिवस सुखाचे आणण्यासाठी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आदेशाप्रमाणे जबाबदारी स्वीकारू आजपर्यंतच्या सार्वजनिक आयुष्यात कोणावर टीका केली नाही. जे चांगले वाट्याला आले, ते वेचत आलो आहे. जिल्ह्यात काम करताना मला सर्वांना बरोबर घेऊन काम करावयाचे असल्याने मुख्यमंत्री जे आदेश देतील, त्याप्रमाणे काम करत राहणार आहे. जी जबाबदारी मिळेल, ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगत पालकमंत्री पदाबाबत जादा बोलणे टाळले.