शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या साथीवरून आरोग्य विभाग धारेवर

By admin | Updated: May 23, 2016 00:21 IST

जयंत पाटील यांच्याकडून कानउघाडणी : मौजे डिग्रजमध्ये बैठक

कसबे डिग्रज : आपणा सर्वांना डेंग्यूच्या साथीचा मोठा त्रास झाला आहे. ही साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी कमी पडले. केवळ आकडेवारी जमा करण्यापेक्षा आरोग्य विभागाने घरोघरी पोहोचून साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करावेत, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी मौजे डिग्रज येथे झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे आ. पाटील यांनी रविवारी सकाळी बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, बांधकाम सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, सरपंच छायाताई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार पाटील यांनी गावात डेंग्यूचे किती रूग्ण आहेत, अशी विचारणा केली. यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४८ रूग्ण असल्याची माहिती दिली. याला आक्षेप घेत ग्रामस्थांनी गावात सातशे ते आठशेजणांना डेंग्यूसदृश लक्षणे असल्याचे सांगितले. यावेळी गोंधळ सुरू झाला. यावर जयंत पाटील यांनी घरोघरी सर्वेक्षण करून साथ आटोक्यात आणण्याचे आदेश दिले.भालचंद्र पाटील यांनी स्वागत केले. यावेळी भाऊसाहेब मगदूम, आनंदा पाटील, सुखदेव साळुंखे, शशिकांत सावंत, पंडित पाटील, शशिकांत नांदणीकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. बी. के. दळवी, सहायक संचालक डॉ. महेश खलिते, डॉ. संगीता देशमुख, डॉ. सुहास शिंदे, डॉ. नरेंद्र पवार, डॉ. मनीषा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)प्रश्नांचा भडीमार : अधिकारी हतबलाजल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी, आरोग्य विभागाने केलेल्या कामाचा आढावा मांडला. यानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करुन, आपणाकडून पावडर मिळाली का? आपण किती रुग्णांना मदत केली? अशी विचारणा केली. यामुळे अधिकारी हतबल झाले होते.