शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

खंडेराजुरीत भिंत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: July 11, 2016 00:59 IST

संततधारेमुळे दुर्घटना : चार वर्षांची मुलगी जखमी; तहसीलदारांनी केली घटनास्थळाची पाहणी

मिरज : मिरज शहर परिसरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. खंडेराजुरीत पावसाने जुन्या घराची भिंत पडून बाबासाहेब तुकाराम चव्हाण (वय ५०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच कळंबीसह अनेक गावांत जुन्या घरांची पडझड झाली. रविवारी दिवसभर संततधार पावसाने मिरजेसह ग्रामीण भागात ओढे-नाले भरून वाहत होते. शनिवारी रात्री खंडेराजुरीतील गांधीनगर येथे चव्हाण वस्तीवर जुन्या घराची भिंत पडल्याने बाबासाहेब चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर चव्हाण यांची पत्नी व चार वर्षांची मुलगी बचावली. पावसाने चव्हाण यांच्या जुन्या घराची माती, विटांची भिंत कोसळली. भिंतीजवळ झोपलेले चव्हाण यांच्या अंगावर ढिगारा पडून ते गंभीर जखमी झाले, तर त्यांच्याशेजारी झोपलेली चार वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली. विटा डोक्यात पडल्याने मार लागून जखमी झाल्याने चव्हाण यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तेथे त्यांचा मृत्यू झाला. चव्हाण यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच प्रभारी तहसीलदार शेखर परब, पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनामार्फत घटनेचा पंचनामा करण्यात आला. कळंबीतही पावसाने रविवारी जुन्या घरांची पडझड झाली. तानाजी इनामदार यांच्या घराची भिंत पडून शेळी जखमी झाली, तर इनामदार कुटुंबीय सुदैवाने बचावले.