शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बिब्ब्या ठरतोय डाळिंब बागांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

बागायतदार संकटात : म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे क्षेत्र वाढले

दादा खोत -सलगरे -मिरज पूर्व भागामध्ये सलगरे, चाबूकस्वारवाडी, बेळंकी या भागामध्ये डाळिंब क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून डाळिंबाला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे साहजिकच या भागामध्ये नवीन डाळिंब क्षेत्र वाढू लागले होते. परंतु बिब्ब्या या रोगाच्या घातक प्रभावाने संपूर्ण डाळिंब बागाच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हैसाळच्या पाण्यामुळे शेतकरी साहजिकच ऊस व भाजीपाला व पिकाबरोबरच डाळिंबाकडे वळला; परंतु डाळिंबाचे पीक बिब्ब्याच्या विळख्यात सापडल्याने डाळिंबाचे क्षेत्र घटू लागले आहे. शेतकरी उभ्या असलेल्या बागाच तोडून टाकत आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून डाळिंबासाठी मार्केटमध्ये उच्चांकी दर मिळत असल्याने डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढले. डाळिंब पिकावर पानावर येणारे डाळिंब पिकाचे मृगबहार व हस्तबहार असे दोन महत्त्वाचे बहर घेतले जातात. परंतु मृगबहारात ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब छाटण्या घेतल्या, त्या बागांना जुलै-आॅगस्टमधील हवेमध्ये दमटपणा वाढल्यामुळे तेल्या रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेल्या रोगावर बुरशीजन्य औषधांचा मारा करूनसुद्धा हा रोग आटोक्यात आला नाही. शिवाय काही शेतकऱ्यांनी आॅरगॅनिक शेती तंत्राचा वापर करून डाळिंब लागवड केली आहे. तसेच बिब्ब्याविरहित टिश्यूकल्चर रोपांचा वापर करूनही रोगाच्या विळख्यातून या वेळेचा मृगबहार वाचू शकला नसल्याने अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कंटाळून बागा काढून टाकणे व इतर लागवडीकडे वळणे पसंत केल्याने डाळिंब पीक धोक्यात आले आहे. डाळिंब हे निश्चितपणे पैसे मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे बिब्ब्या, तेल्या रोगांवर संशोधन होणे गरजेचे आहे. तरच या तेल्याच्या विळख्यातून बागा वाचू शकतील. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावअल्टरनेरिया, लिक स्पॉट, सर्कोस्पोरा, फळावर येणारे ब्लॅक हॉर्ट, अ‍ॅन्थ्युकॅनोज, फळावर येणारा ब्लाइट, फळावरील सर्कोस्पोरा आणि ब्रोट्रायरिस आदी बुरशीजन्य रोगांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळतो. चांगल्या उत्पादनासाठी आंबेमोहर पूर्व छाटणीची गरजबिब्ब्या नियंत्रणासाठी आॅरगॅनिक शेतीतंत्राचा वापर वाढवणेहवामानाचा अचूक अंदाज घेऊन फवारण्यांचे नियोजन करणे